Agriculture day Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Day : कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतीदिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अतर्गंत कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड, औरंगाबाद यांच्या पशुसंवर्धन ‍व दुग्धशास्त्र विभागामार्फत मुर्शिदाबादवाडी येथे शेती दिन साजरा करण्यात आला.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी (VNMKV) अतर्गंत कृषी विज्ञान केंद्र (Krishi Vigyan Kendra) पैठण रोड, औरंगाबाद यांच्या पशुसंवर्धन ‍व दुग्धशास्त्र विभागामार्फत (Animal Husbandry Department) मुर्शिदाबादवाडी येथे शेती दिन (Agriculture Day) साजरा करण्यात आला.

यावेळी परसबाग कुक्कुटपालनासाठी उपयुक्त असलेल्या ग्रामप्रिया या कोंबडी बाबत माहिती देण्यात आली.डॉ. अनिता जिंतूरकर यांनी परसातील कुक्कुटपालनाचे महत्त्व सांगत ग्रामप्रिया ही अंडी व मासांसाठी उपयुक्त, वर्षाकाठी १८० ते २०० अंडी देते. अंड्यांचा रंग हा तपकिरी तसेच गुलाबी आहे.

पहिले अंडे देण्याचा कालावधी हा १६० ते १६५ दिवसाचा आहे. अंड्याचे वजन हे सरासरी ५२ ते ५८ ग्रॅम असते. परसातील कुक्कुटपालनाकडे अधिक महिलांनी वळावे, असे आवाहन केले.

प्रात्यक्षिक धारक महिलांनी अंड्याच्या चवीमुळे अंड्याला चांगली मागणी आहे, असे मनोगत व्यक्त केले. या शेती दिनास कृषी विभागाच्या संदीप दळवी, रामभाऊ सांळुके, डॉ. संजुला भावर, डॉ. बी. एल. पिसुरे, गणेश जाधव व शेतकरी यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT