Dr. Panjabrao Deshmukh
Dr. Panjabrao Deshmukh Agrowon
ताज्या बातम्या

Dr. Panjabrao Deshmukh : पंजाबराव देशमुखांच्या गावात होणार कृषी महाविद्यालय

Team Agrowon

अमरावती ः देशाचे पहिले कृषिमंत्री (Agriculture Minister) असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) यांचे पापळ हे मूळ गाव. त्यांच्या गावात कृषी शिक्षणाची (Agriculture Education) सोय असावी अशी मागणी होती. त्याची दखल घेत शासनाने कृषी विद्यापीठाला कृषी महाविद्यालयाकरीता जागेचा शोध घेण्याची सूचना केली आह

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बहुजनांच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरिता श्री शिवाजी शिक्षण संस्थेची उभारणी केली. राज्यात दुसऱ्या क्रमांकाची ही संस्था आज आहे. पंजाबराव देशमुख यांनी देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून काम पाहिले.

त्यांच्या काळात कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचावे याकरिता कृषी प्रदर्शनासारखा उपक्रम राबविण्यात आला. याच पंजाबराव देशमुखांचे गाव असलेल्या पापळ येथे कृषी शिक्षणाची सोय असावी अशी मागणी होत होती.

हिवाळी अधिवेशनात आमदार प्रताप अडसड यांनी ती राज्य सरकारकडे लावून धरली. त्याची दखल घेत राज्य सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार डॉ. शामसुंदर माने, सुधीर वडतकर, राजेंद्र गोळे, चंद्रकांत पाटील आदी पापळ गावाला भेट देत जागेची पाहणी केली. या वेळी पापळच्या सरपंच अनिता वानखडे, वाल्मीक इंगळे, काजना सरपंच नरेंद्र मुंदे, संजय भोयर, किशोर गुलालकरी, युवराज इंगळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

शासनाच्या सुचनेनूसार प्राथमिक चौकशी करण्यात आली. कृषी महाविद्यालयाबाबतचा हा प्रस्ताव आहे.

- डॉ. शामसुंदर माने,अधिष्ठाता (कृषी)

पंजाबराव देशमुख यांनी देशात कृषीला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वाच्या गावातून कृषी अभ्यासक्रमातून तज्ज्ञाची जडणघडण व्हावी याकरिता कृषी महाविद्यालयासाठी पाठपुरावा करण्यात आला.

- प्रताप अडसड,आमदार, धामणगावरेल्वे मतदार संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT