ताज्या बातम्या

Agriculture Entrepreneur : कृषी उत्पादक आता उद्योजक व्हावा

संत्र्यावर प्रक्रिया उद्योग निर्माण करून भावी पिढीला उद्योजकाचा दर्जा प्राप्त करून देणाऱ्या तेलंगणा राज्याच्या धर्तीवर योजना आणण्याचा पुढाकार काटोल बाजार समितीने घेऊन आदर्श निर्माण करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केले.

टीम ॲग्रोवन

काटोल, नागपूर : ‘नागपूर मॅडरीन’ ही संज्ञा आता जागतिक संपदेत समाविष्ट असल्यामुळे ऋतू कायम ठेवून निर्यातीत (Export) वाढ करणे सुलभ होणार आहे. तसेच, संत्र्यावर प्रक्रिया उद्योग (Orange Food Processing) निर्माण करून भावी पिढीला उद्योजकाचा (Agriculture Entrepreneur) दर्जा प्राप्त करून देणाऱ्या तेलंगणा राज्याच्या धर्तीवर योजना आणण्याचा पुढाकार काटोल बाजार समितीने घेऊन आदर्श निर्माण करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्व साधारण सभा व विकास कामांचे भूमिपूजन तसेच शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्रात ते बोलत होते. संत्राफळ विम्याचे नागपूर जिल्ह्यासाठी ८०,००० रुपयांच्या विम्यासाठी २०,००० चा हफ्ता हा अवास्तव असून संत्रा उत्पादकाला आर्थिक विवंचनेत टाकणारा आहे. तसेच २०१९ चे बंगालदेशने २० रुपये आयात शुल्क २०२२ साठी ६३ रुपये करणे, हा मोठा आर्थिक आघात संत्रा उत्पादकांना बसला आहे.

या दोन्ही बाबीवर बाजार समितीने सभापती चरणसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पुढाकार घेऊन पुन्हा बांग्लदेशात इथून होणारी सामन्यतः ३५ ते ४० टक्के निर्यात कायम करावी, असे आवाहन डॉ. निंबाळकर यांनी केले.

शेतकऱ्यांच्या सर्व अडचणींच्या सोडवणुकीसाठी बाजार समिती कार्यरत राहून शेतकरी सुखीसंपन्न आणि समृद्ध करण्यास समिती कटीबद्ध असल्याचे अभिवचन समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर यांनी दिले. या वेळी आधुनिक एकीकृत शेतीचे प्रसारक कृषिमित्र दिनेश ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा दावाही उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे वापराने होऊ शकतो, असे मत व्यक्त केले.

आंबिया बहारातील अडी-अडचणीवर मात करण्याचे तंत्र दिनेश कांबे यांनी शेतकऱ्यांना दिले. या वेळी शेतकरी प्रचंड संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, कृषिमित्र दिनेश ठाकरे, किसान मंचचे जिल्हा अध्यक्ष संदीप सरोदे आदी मान्यवरांसह अनेक मंडळी कार्यक्रमात उपस्थित होती.

यावेळी सहकारी संस्थांचे पदाधिकारी, निवनिर्वाचित पदाधिकारी कृषक बांधवांचा तसेच महिला शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. संचालन सचिव पराग दाते यांनी केले. आभार किशोर गाढवे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget Agri: शेतकऱ्यांना ‘नारळ’

Agri Union Budget: भविष्यातील शेतीसाठी दिशादर्शक घोषणा

Union Budget 2026-27: कर्तव्यांच्या त्रिसूत्रीवर अर्थसंकल्पाचा भर

Maharashtra Winter Weather: उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT