Agriculture Technology Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Technology : क्यूआर कोडद्वारे कृषिविषयक माहिती मिळणार एका क्लिकवर

कृषिविषयक कुठलीही माहिती हवी असेल, तर क्यूआर कोड स्कॅन करा आणि एका क्लिकवर माहिती मिळवा, अशी सुविधा येथील कृषी विज्ञान केंद्राने तयार केली आहे.

Team Agrowon

अकोला ः कृषिविषयक (Agriculture Information) कुठलीही माहिती हवी असेल, तर क्यूआर कोड स्कॅन करा आणि एका क्लिकवर माहिती मिळवा, अशी सुविधा येथील कृषी विज्ञान केंद्राने (KVK) तयार केली आहे. येथे झालेल्‍या कृषी महोत्सवात केव्हीकेने ही सुविधा उपलब्ध करून देत हजारो शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.

कृषी विज्ञान केंद्राने कृषीविद्या, उद्यानविद्या, पशुविज्ञान, गृहविज्ञान, माती परीक्षण, कृषिविस्तार, पीकसंरक्षण अशा कृषिविषयक विविध विषयांची माहिती एकत्र केली आहे. ही माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून मोबाईलद्वारे थेट उपलब्ध होईल, अशी सुविधा निर्माण केली आहे. शेतकऱ्यांना जेव्हा शेतीमध्ये कृषिविषयक माहितीची गरज असते तेव्हा त्यांच्याकडे बऱ्याच वेळा माहितीपत्रक उपलब्ध नसते.

परंतु मोबाईल असल्याने ज्या विषयाची त्याला माहिती हवी असते तेव्हा स्कॅनरद्वारे त्याचा कोड स्कॅन करून ती उपलब्ध होऊ शकते. कृषी विज्ञान केंद्राद्वारे सुमारे ६० विषयांचे क्यूआर कोड तयार करण्यात आले आहेत. शिवाय सर्व विषयांचा एकच क्यूआर कोड दिल्याने त्याद्वारे माहितीची देवाणघेवाण करणेसुद्धा सोयीचे झाले आहे.

हा क्यूआर कोड तयार करण्यासाठी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. उमेश ठाकरे, गजानन तुपकर, डॉ. गोपाल मंजुळकर, कुलदीप देशमुख, डॉ. चारुदत्त ठिपसे, कीर्ती देशमुख, सचिन महल्ले यांनी पुढाकार घेतला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महोत्सवादरम्यान या सुविधेची माहिती घेत राज्याचे प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले, कुलगुरू डॉ. शरद गडाख या प्रमुख मान्यवरांसह इतरांनी केव्हीकेच्या दालनाला भेट दिली. या वेळी त्यांनी क्यूआर कोड स्कॅन करून माहिती मिळते किंवा नाही हे तपासले. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोड स्कॅन करीत माहिती घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy: अमरावती जिल्ह्यात घरकुलांमध्ये मिळणार सौर ऊर्जेचा लाभ

Crop Insurance: सरासरी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Flaxseed Farming: धान उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची जवसाला पसंती

Summer Moong Crop: कमी कालावधीत येणारे उन्हाळी मुगाचे ९ वाण

Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी

SCROLL FOR NEXT