ताज्या बातम्या

Agri Student Protest : कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आक्रमक

महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम सर्व विद्याशाखेतील परीक्षार्थीला समान न्याय देणारा, कोणत्याही प्रकारचा भेदभाव विरहित तसेच नैसर्गिक न्यायतत्वाद्वारे समान संधी देणारा आहे.

Team Agrowon

Agri Student Protest परभणी ः महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षेचा सध्याचा अभ्यासक्रम कायम ठेवावा. २०२२ मध्ये झालेल्या परीक्षांना स्थगिती देऊ नये.

कृषी विद्यापीठातील रिक्त पदांची भरती सुरू करावी, आदी मागण्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या स्पर्धा परीक्षा उमेदवार विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. ६) कुलगुरू कार्यालय तसेच शिक्षण संचालक कार्यालयावर मोर्चा काढला.

महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम सर्व विद्याशाखेतील परीक्षार्थीला समान न्याय देणारा, कोणत्याही प्रकारचा भेदभाव विरहित तसेच नैसर्गिक न्यायतत्वाद्वारे समान संधी देणारा आहे. या परीक्षेतील दोन्ही पेपर अनिवार्य असल्यामुळे यातून जबाबदार कार्यक्षम व सर्वज्ञान संपन्न कृषी अधिकारी निवडले जातील. यामुळे हाच अभ्यासक्रम कायम ठेवण्यात यावा.

सद्यःस्थितीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठात केवळ कृषी अभियांत्रिकेचेच विद्यार्थी आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमावर व चुकीची आकडेवारी देऊन विद्यापीठ प्रशासन, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिशाभूल करीत आहेत.

या आंदोलनाला काही कृषी विद्यापीठाचे जबाबदार कुलगुरू इतर राजकीय नेतेमंडळी तसेच काही संघटना विद्यार्थ्यांच्या चुकीच्या आंदोलनाला अपप्रेरणा देत आहेत.

त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा मलिन केली जात असून आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून कृषी विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरविला जात आहे.

सध्याचा अभ्यासक्रम आहे तसाच ठेवावा. जाहिरात क्र. ०१७-२०२२ आणि ०८७-२०२२ या परीक्षा प्रक्रियेला स्थगिती देऊ नये. संबंधितावर योग्य ती कठोर कार्यवाही करावी. आयोगाने भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ५५ टक्के पदे रिक्त आहेत.

बेरोजगार कृषी पदवीधरांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कृषी सहायक (पदवीधर), कनिष्ठ संशोधन सहायक (जेआरए), वरिष्ठ संशोधक सहायक (एसआरए), इतर सर्व रिक्त पदांची भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी. या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Road Development: महामार्गाच्या थांबलेल्या कामास प्रारंभ

Rural Entrepreneurship: गाव तेथे उद्योजक संकल्पना राबवविणार

Agriculture Assistant Officers: ‘सहायक कृषी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींमध्ये जागा मिळावी’

Agrowon Podcast: शेवगा भाव नरमले; सोयाबीन स्थिरावले, कापसात चढ उतार, केळीचे दर टिकून तर गवार तेजीतच

PM Kisan Yojana: अर्थसंकल्पात 'पीएम किसान'साठी किती तरतूद?; २२ वा हप्ता 'या' तारखेला मिळू शकतो

SCROLL FOR NEXT