Agriculture Electricity
Agriculture Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : शेतीसाठी दिवसा वीज न दिल्यास आंदोलन करणार

Team Agrowon

Agriculture Electricity पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यात आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात (थLeopard Attack) अनेक जनावरे आणि माणसे दगावली आहेत. शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत (Leopard Terror) आहे.

तरीही वीज वितरण कंपनी आठवड्यातील चार दिवस रात्रीचा शेतीला वीजपुरवठा (Electricity) करत असल्याने शेतकऱ्यांना बिबट्याच्या दहशतीत रात्री पिकांना पाणी भरावे लागते.

शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.

सध्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात अनेक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. अनेक नागरिक जखमी झाले आहेत. पाळीव प्राण्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत.

अनेक जनावरे जखमी झाली आहेत. मेंढपाळ समाज देखील भयभीत झाला असून त्यांनी या भागातून काढता पाय घेतला आहे.

अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतीला पाणी द्यावे लागते आणि रात्रीच्या वेळी बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडत असतो. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांवर हल्ले होऊन शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.

त्यामुळे आंबेगाव तालुका आणि परिसरामध्ये शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

या भागातील शेतकरी व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शेतीला दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन उभे करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Sangh Fraud : शेतकरी संघ अपहार प्रकरण; मुख्य व्यवस्थापकाला २० लाख दिल्याचा आरोप, संचालक बैठकीत खळबळ

Mhaisal Water Scheme : विस्तारित म्हैसाळ योजनेची कामे तातडीने मार्गी लावा

Maharashtra Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत विजांच्या लखलखाटांसह पाऊस

Agrowon Podcast : हळदीतील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद आणि टोमॅटोचे काय आहेत दर ?

Cotton Seed Sales : खानदेशात कापूस बियाणे विक्री १५ मे पासून

SCROLL FOR NEXT