Modern Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Modern Agriculture : आधुनिक शेतीचा अवलंब केल्यास शाश्‍वत रोजगार मिळेल

धारूर तालुक्यात मोठ्या प्रमाणत रेशीम, सीताफळ अशी वेगवेगळी शेती केली जाते या शेतीतून शेतकरी आर्थिक उन्नती साधून आपला प्रपंच चालवत आहेत.

Team Agrowon

Beed Agriculture News : धारूर तालुका ऊसतोड मजुरांचा तालुका ओळखला जातो. मात्र येथील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून आधुनिक शेतीचा (Modern Agriculture) अवलंब केल्यास शेतकऱ्यांना शाश्‍वत रोजगार (Employment) मिळून कोयता हातून निघू शकतो, असे मत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी व्यक्त केले.

धारूर तालुक्यात मोठ्या प्रमाणत रेशीम, सीताफळ अशी वेगवेगळी शेती केली जाते या शेतीतून शेतकरी आर्थिक उन्नती साधून आपला प्रपंच चालवत आहेत. बुधवारी (ता.१९) बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी धारूर तालुक्याला भेट दिली.

या वेळी भोपा येथील गाळ उपसा प्रारंभ केला. तसेच पुढे सोनीमोहा या ठिकाणी जाऊन रेशीम शेतीची पाहणी केली. काही तुतीच्या शेडचे अनुदान रखडले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. या वेळी जिहाधिकारी यांनी तत्काळ रेशीम विभागाला संपर्क करून अनुदान वर्ग करा, असे आदेश दिले.

जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतरच धारूर तालुक्यात प्रथमच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी शेतीसह तहसील कार्यालयाला भेट दिली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी तालुक्यातील भोपा येथे गाळ उपसा उपक्रमाचा प्रारंभ केला.

तसेच भोपा येथील सीताफळांच्या, आंब्याच्या बागांची ही पाहणी केली. याचबरोबर सोनी मोहा येथील रेशीम शेतीची पाहणी करून येथे रेशीम कीटक संगोपनाची माहिती घेतली.

त्या वेळी त्यांनी सोनी मोहा प्रमाणेच तालुक्यामध्ये इतर शेतकऱ्यांनी रेशीम शेतीत वाढ करून त्यामध्ये प्रक्रिया केल्यास अधिक फायदा होऊ शकतो. या वेळी धारूर तहसीलदार माधव काळे, नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT