Godavari Agrowon
ताज्या बातम्या

Godavari Project : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वसाधारण आणि आदिवासी क्षेत्रातील गोदावरी नदीच्या उपनद्यांवरील आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प (Uppar Godavari Project) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वसाधारण आणि आदिवासी क्षेत्रातील गोदावरी नदीच्या (Godavari River) उपनद्यांवरील आहे. या प्रकल्पाच्या एक हजार ४९८ कोटी ६१ लाखांच्या चौथ्या सुधारित प्रकल्प अहवालास जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे नाशिक, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील ७४ हजार २१० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

प्रकल्पात वाघाड, करंजवण, पालखेड, ओझरखेड, तिसगाव व पुणेगाव अशा सहा प्रकल्पांचा समावेश आहे. करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणे या प्रकल्पांच्या स्थिरीकरणासाठी देवसाने (मांजरपाडा) वळण योजना व इतर ११ प्रवाही वळण योजनांचा समावेश आहे. यापूर्वीच्या तीन मान्यतेनंतर आता २०१८-१९ च्या दरसूचीनुसार चौथ्यांदा प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या रकमेमध्ये १ हजार ३९४ कोटी ६ लाख रुपये कामासाठी खर्च अपेक्षित आहे.

उरलेल्या १०४ कोटी ५५ लाख रुपये आनुषंगिक बाबींवर खर्च केले जातील. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या अहवालातील मुद्यांची पूर्तता आता करावी लागणार आहे. त्याचबरोबर आणखी खर्चाचा बोजा वाढेल, अशा नवीन बाबींचा समावेश सरकारच्या मान्यतेशिवाय प्रकल्पात करता येणार नाही.

दरम्यान, आमदार छगन भुजबळ म्हणाले, ‘‘नाशिक जिल्ह्यांतील ११ प्रवाही वळण योजनांसाठी २०६ कोटी ५१ लाख, देवसाने-मांजरपाडा प्रकल्पासाठी ४६४ कोटी ४० लाख, वाघाडसाठी ५ कोटी ७ लाख, करंजवणसाठी ७ कोटी ७६ लाख, ओझरखेडसाठी ८ कोटी १३ लाख, पालखेडसाठी ३ कोटी ६१ लाख, तिसगावसाठी ५० कोटी सात लाख, पुणेगावसाठी १२ कोटी पाच लाख अशा एकूण ७६० कोटी ६१ लाखांच्या निधीस मान्यता मिळाली आहे.

कालवा व वितरकांच्या दुरुस्तीसाठी ६३३ कोटी ४५ लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यात वाघाडच्या ११ कोटी ९७ लाख, करंजवणच्या ४ कोटी ९८ लाख, ओझरखेडच्या ७३ कोटी १८ लाख, पालखेडच्या ६७ कोटी ९० लाख, तिसगावच्या ६६ लाख, पुणेगावच्या २९४ कोटी ९६ लाख, तर दरसवाडीच्या १७९ कोटी ७९ लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे.’’

अपूर्ण कामे होतील पूर्ण : भुजबळ

मांजरपाडासह वळण योजनांची आणि पुणेगाव, दरसवाडी, ओझरखेड, पालखेड कालव्यांची अपूर्ण कामे पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nitin Gadkari: आम्हाला खंत, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादन सगळ्या विदर्भापेक्षाही अधिक- नितीन गडकरी

Agrowon Diwali Article: जग बदलतंय, शेतीचं गणितही बदलतंय

Drought Relief Maharashtra: दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, मदतीसाठी थेट तालुका स्तरावर यंत्रणा

Grape Disease Management: थंडी वाढताच द्राक्ष बागेत केवडा, भुरी आणि करपा रोगांचा धोका; कोणत्या उपाययोजना महत्त्वाच्या?

Agrowon Diwali Article: निर्यातक्षम डाळिंब शेतीतील आदर्श प्रयोग

SCROLL FOR NEXT