Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Aditya Thackeray : ... तर सरकारने चालत व्हावे

आदित्य ठाकरे ः जुन्नर, शिरूर तालुक्यांत अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा

टीम ॲग्रोवन

जुन्नर, शिरूर, जि. पुणे ः ‘‘राज्यात गद्दारीने स्थापन झालेल्या घटनाबाह्य सरकारचे निर्दयीपणे काम चालू असून, लोकसेवा विसरून सत्तेत मश्गूल असलेल्या सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. सद्यःस्थितीत अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकरी बांधवांना सावरता येत नसेल, तर सरकारने चालते व्हावे,’’ असा इशारा शिवसेना (Shivsena) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Adity Thakrey) यांनी दिला. शेतकऱ्यांनी सर्व मंत्र्यांसाठी ‘नुकसान भरपाई (Crop Insurance)देता की घरी जाता’ हा नारा बुलंद करावा,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

ठाकरे यांनी जुन्नर आणि शिरूर तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी गुरुवारी (ता.२७) केली. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेते आणि जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर, सहसंपर्क प्रमुख अविनाश रहाणे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर व ज्ञानेश्वर कटके, जिल्हा संघटक संजय देशमुख, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, यांच्यासह जुन्नर तालुक्यातील पदाधिकारी, जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी संपर्कप्रमुख संभाजी तांबे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, उपसभापती दिलीप डुंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, मंगेश काकडे, नारायणगाव सरपंच बाबू पाटे, पंचायत समितीचे सदस्य जीवन शिंदे, गणेश कवडे, गणेश वाघमारे, ग्रामपंचायतीचे सदस्य डी. बी. वाळुंज आदी उपस्थित होते.

दरम्यान, ठाकरे यांनी वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून पत्र लिहून आत्महत्या केलेल्या दशरथ केदारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. शिवसेना या कुटुंबीयांच्या पाठिशी उभी राहणार असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकषांची अट घालू नये. अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. पंचनामे झालेत तिथले प्रस्ताव शासनदरबारी गेले नाही. जे गेलेत ते मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे एवढे मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्याच्या हातात एक पैसादेखील अद्यापपर्यंत पडलेला नाही. पाठित खंजीर खुपसून खुर्ची मिळविलेल्यांनी, आमच्याशी गद्दारी करून सत्तेत बसलेल्यांनी किमान महाराष्ट्रातील सामान्य जनतेशी, शेतकरी बांधवांशी तरी गद्दारी करू नये.

- आदित्य ठाकरे, माजी मंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT