Fertilizer Agrowon
ताज्या बातम्या

केंद्र सरकारकडून खतांसाठी १.१० लाख कोटींचे अतिरिक्त अनुदान

अर्थमंत्री सीतारामन; खते दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा

टीम ॲग्रोवन

वृत्तसंस्था
नवी दिल्ली ः जागतिक स्तरावर खतांच्या झालेल्या दरवाढीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाकडून १.१० लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान वितरिक केले जात आहे. त्यातील १.५ लाख कोटी रुपये २०२२-२३ च्या वार्षिक अर्धसंकल्पामध्ये अगोदरच मंजूर केलेले आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी (ता. २१) म्हणाल्या.

सीतारामन यांनी एकापाठोपाठ ट्वीट केले आहेत. त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या करात केलेल्या कपातीबाबत माहिती दिली. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे दर आवाक्यात ठेवण्याची ग्वाही दिली. त्या म्हणाल्या की, जग हे एका कठीण काळातून जात आहे. त्याचबरोबर कोविड महामारीच्या संकटातून सावरत आहे. मात्र, युक्रेन युद्धामुळे जगभरात पुरवठा साखळीत अडचणी निर्माण झाल्या असून विविध वस्तूंची कमतरता जाणवत आहे. युक्रेनच्या युद्धामुळे जगभरात अनेक देशांमध्ये महागाई आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे, असेही, मंत्री सीतारामन म्हणाल्या.

आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय परिस्थिती असूनही जीवनावश्‍यक वस्तूंची कमतरता, टंचाई होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. अगदी विकसीत राष्ट्रांनाही काही बाबींच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, आम्ही जीवनावश्‍यक वस्तुंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे ही सीतारामन म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT