Onion Rate Agrowon
ताज्या बातम्या

Onion Rate : शेतकऱ्याची थट्टा भोवली

दहा पिशव्यांच्या कांदा विक्रीपोटी शेतकऱ्याला दोन रुपयांचा चेक देणाऱ्या सोलापूर बाजार समितीतील आडत व्यापाऱ्य़ाविषयी सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त झाला.

Team Agrowon

Onion Market News सोलापूर ः दहा पिशव्यांच्या कांदा विक्रीपोटी (Onion Rate) शेतकऱ्याला दोन रुपयांचा चेक देणाऱ्या सोलापूर बाजार समितीतील आडत व्यापाऱ्य़ाविषयी सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त झाला.

त्यानंतर आणि माध्यमातूनही टीकेची झोड उठल्यानंतर सोलापूर बाजार समितीचे (Solapur APMC) प्रशासन खडबडून जागे झाले आहे. व्यापाऱ्याच्या या कृतीवर ठपका ठेवत बाजार समितीच्या प्रशासनाने संबंधित व्यापाऱ्याचा आडत परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला आहे.

बार्शी तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी १७ फेब्रुवारीला सोलापूर बाजार समितीत सूर्या ट्रेडिंग या आडत व्यापाऱ्याकडे दहा पिशव्या कांदा विक्रीस आणला होता. त्यांच्या कांद्याचे वजन ५१२ किलो भरले.

त्यात प्रतिकिलो अवघा एक रुपया इतका दर त्यांना मिळाला. त्यानुसार ५१२ रुपयांची पट्टी त्यांना मिळाली.

पण त्यातून पुन्हा हमाली, तोलाई, मोटारभाडे आदी ५०९.५१ पैसे खर्च वजा जाता २ रुपये ४९ पैसे शिल्लक उरले. पण उरलेले हे पैसे शेतकऱ्याला देण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याने चक्क दोन रुपयांचा चेक दिला. त्यावर कडी म्हणजे हा चेक पंधरा दिवसांनी वटेल, अशी तारीख त्यावर टाकून दिली होती.

‘अॅग्रोवन’ने यासंबंधीचे सविस्तर वृत्त २४ फेब्रुवारीच्या अंकात पान १ वर ठळकपणे प्रसिद्ध केले. तसेच व्यापाऱ्याच्या या असंवेदनशील कृतीबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला.

घाईगडबडीत चुक म्हणून सारवासारव

बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्याला खुलासा मागितला. पण संगणकीकृत कामकाजामुळे अशा पद्धतीचा चेक तयार झाला आणि घाईगडबडीत ही चूक झाल्याचे व्यापाऱ्याकडून उत्तर देण्यात आले.

पण हा खुलासा समाधानकारक नसल्याने बाजार समितीचे सचिव चंद्रशेखर बिराजदार यांनी संबंधित व्यापाऱ्याचा आडत परवाना १५ दिवसांसाठी निलंबित करण्याची कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Electricity Bill Dues: चार लाख ग्राहकांकडे २८२ कोटी वीजबिल थकबाकी

Soybean Procurement: सांगलीच्या हमीभाव केंद्रांवर दोन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Dhule Administration Plan: धुळे जिल्ह्यात ३२९ गावांसाठी दोन कोटींचा आराखडा

Akola Development Plan: अकोला जिल्हा नियोजन समितीचा ३५२ कोटींचा आराखडा मंजूर

Heritage Trees: हजारो पावसाळे बघितलेली प्राचीन झाडे

SCROLL FOR NEXT