Sand Extraction Agrowon
ताज्या बातम्या

Sand Mafia : वाळू चोरीविरोधात कारवाईचे सत्र

गिरणा नदीतून बांभोरी ते जळगाव, तसेच सावखेडा शिवारातून वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली.

Team Agrowon

Sand Excavation News जळगाव ः गिरणा नदीतून (Girana River) बांभोरी ते जळगाव, तसेच सावखेडा शिवारातून वाळूची अवैधरीत्या वाहतूक (Illieagal Sand Transport) करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत सुमारे सहा ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे वाळूमाफियांचे (Sand Mafia) धाबे दणाणले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी ते जळगावदरम्यान पोद्दार शाळेवर विनाक्रमाकांच्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३) दुपारी कारवाई केली.

या कारवाईत एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी पोना हरिश शिंपी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी कारवाई महामार्गावर हॉटेल साई पॅलेससमोर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली असून, विनाक्रमाकांच्या ट्रॅक्टवरवरील चालकाविरोधात पोलिस कॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तिसऱ्या कारवाईत महामार्गावरील हॉटेल मराठासमोर एक ट्रॅक्टर पकडला.

वाळूसह विनाक्रमाकांची ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली असून, तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच खोटेनगर स्टॉपजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विनाक्रमाकांचा ट्रॅक्टर पकडला असून, तालुका पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महामार्गावरून चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी सावखेडा शिवारातून वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली. ट्रॅक्टरचालक विशाल नरेंद्र पवार (वय २१, रा. सावखेडा बुद्रुक, ता. जळगाव) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Equipment Lottery : शेतीपूरक अवजारे, साहित्यासाठी २४५९ लाभार्थ्यांना ‘लॉटरी’

Fake Teachers Scam: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षण विभागाची धडक कारवाई; बनावट शिक्षकांचा पर्दाफाश होणार?

Warehouse Operator: गोदाम ऑपरेटर हा महत्त्वाचा घटक

Farmer Debt Recovery: शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या १९ जिल्ह्यांमध्ये नोटीसा; कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा

Washim Jaltara Project : प्रबळ इच्छाशक्तीने सिद्धीस नेला जलतारा प्रकल्प

SCROLL FOR NEXT