rice-mill  Agrowon
ताज्या बातम्या

Gondia Rice Mill : गोंदियातील निकृष्ट तांदूळप्रकरणी ३७ राइस मिलवर कारवाई

Substandard Rice : निकृष्ट दर्जाच्या तांदूळ पुरवठा प्रकरणी जिल्ह्यातील ३७ राइस मिलर्सवर कारवाई करण्यात आली आहे.

Team Agrowon

Gondia News : निकृष्ट दर्जाच्या तांदूळ पुरवठा प्रकरणी जिल्ह्यातील ३७ राइस मिलर्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना सहा आठवड्यांत तेवढाच तांदूळ नव्याने जमा करण्याचेही आदेश आहेत.

मात्र गुणवत्ता निरीक्षकांनी उत्कृष्ट म्हणून तपासणीअंती गोदामात जमा केलेला तांदूळ आता निकृष्ट कसा झाला असा सवाल करीत या विरोधात राइस मिलर्सनी न्यायालयात धाव घेतली आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने हमीभावाने शासकीय धान खरेदी करण्यात येते. खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्सकडून भरडाई होते. त्यांकरिता काही राइस मिलर्ससोबत करार केला जातो. त्यानंतर राइस मिलर्स भरडाई करून सीएमआर तांदूळ पुरवठा विभागाच्या माध्यमातून एफसीआयकडे जमा करतात. तांदूळ जमा करण्यापूर्वी तांदळाच्या लॉटची गुणवत्ता निरीक्षकांकडून तपासणी होते.

त्यानंतरच तो गोदामात जमा केला जातो. गोदामात जमा केलेला हा तांदूळ कधी दोन महिन्यांत तर कधी वर्षभराच्या कालावधीनंतर स्वस्त धान्य दुकानात वितरित करण्याची पद्धती आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातून कोल्हापूर, नाशिक, लातूर, नंदुरबार या जिल्ह्यांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता.

यांपैकी काही तांदळाच्या लॉटची केंद्रीय पथकाने तपासणी केली. त्या वेळी हा तांदूळ मानवास खाण्यायोग्य नसल्याची धक्‍कादायक बाब समोर आली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत हा तांदूळ ज्या राइस मिलर्सनी जमा केला होता. त्यांनाच तो परत पाठवून तेवढाच तांदूळ नव्याने जमा करण्यास सांगण्यात आले.

या संबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी चिन्मय काळे यांना मिळताच त्यांनी 37 राइस मिलर्सवर कारवाई करीत त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. तीन वर्षासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. राइस मिलर्सनी भरडाई करून जमा केलेल्या 22 हजार क्‍विंटल तांदळाच्या गुणवत्तेवर प्रश्‍न निर्माण करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT