Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Inaguration of Krishikul : ‘ग्लोबल विकास ट्रस्ट कृषिकूल’ या २५ एकरांवरील ट्रेलब्लॅझिंग शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
Inaguration of Krishikul
Inaguration of KrishikulAgrowon
Published on
Updated on

Beed News : कृषी पद्धतीत उन्नती घडवून आणण्यासाठी आणि त्यात परिवर्तन करण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टने तयार केलेल्या ‘ग्लोबल विकास ट्रस्ट कृषिकूल’ या २५ एकरांवरील ट्रेलब्लॅझिंग शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

Inaguration of Krishikul
Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

मोतिलाल ओसवाल फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून २५ कोटी रुपयांच्या खर्चातून आधुनिक, शाश्वत शेतीतंत्राने सुसज्ज असे हे संकुल शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आले आहे. या उद्घाटन कार्यक्रमास मोतिलाल ओसवाल फाउंडेशनचे विश्वस्त रामदेव अग्रवाल, मोतिलाल ओसवाल आणि ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक मयंक गांधी उपस्थितीत होते.

Inaguration of Krishikul
Global Vikas Trust : मराठवाड्यातील 'ग्लोबल विकास ट्रस्ट'ची सुरुवात कशी झाली ?

या वेळी बोलताना डॉ. रामदेव अग्रवाल म्हणाले, की शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्लोबल विकास ट्रस्ट कृषिकूलच्या मदतीने प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांना सशक्त बनवणे आणि संपूर्ण ग्रामीण समुदायाची उन्नती करणे हा मोतीलाल ओसवाल फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे.

मोतिलाल ओसवाल म्हणाले, की शेतकऱ्यांची उत्पादकता आणि त्यांच्या पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत. तर मयंक गांधी म्हणाले, की मोतिलाल ओसवाल फाउंडेशनच्या पाठिंब्याने, आम्ही केवळ प्रशिक्षण देत नाही तर शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वतपणे वाढविण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहोत. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com