Satara News : सातारा जिल्ह्यात दूध भेसळीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. दूध भेसळीला आळा घालण्यासाठी दूध व्यवसाय विभाग व अन्न औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. महिनाभरात जिल्ह्यात भेसळ करणाऱ्या २८ जणांवर कारवाई केली असून तब्बल एक हजार ७०० लिटर दूध नष्ट केले.
राज्यासह जिल्ह्यात मागणी आणि दूध उत्पादनात मोठी तफावत आढळून आली आहे. तसेच राज्यभरात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त प्रमाणात भाव मिळत नाही. याचबरोबर भेसळयुक्त दूध शरीरासाठी घातक असल्याने दूध भेसळीला आळा बसणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर दूध व्यवसाय विभाग, अन्न औषध प्रशासन, वजन माप विभाग, पशुसंवर्धन विभागाने दूध भेसळीविरोधातील कारवाईची गती वाढवली आहे. गेल्या महिनाभरात दूध टँकरसह दूध पिशव्यांचीदेखील तपासणी सुरू आहे. यामध्ये काही संशयित वाटल्यास नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात.
नमुन्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जात आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात २०१ दूध डेअरी, दूध टँकरची तपासणी केली. त्यामध्ये आतापर्यंत एक हजार ६१० लिटर प्रशासनाने नष्ट केले. तसेच ७४ नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. याचबरोबर आतापर्यंत चार जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर नऊ जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
जिल्हाभरात दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जात असून दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जात आहे. त्यामुळे दूध उत्पादक, खासगी दूध संघ, दूध डेअरी यांनी उच्च प्रतीचे दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करावी. अन्यथा जे दोषी आढळले जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.- प्रकाश आवटे, जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.