Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : खरीप हंगामात १०१ टक्के पीककर्जाचे उद्दिष्ट्य साध्य

खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात सप्टेंबर २०२२ पर्यंत तीन हजार ९९६ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. खरीप हंगामामध्ये नियोजित असलेले पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : खरीप हंगामामध्ये (Kahrif Season) जिल्ह्यात सप्टेंबर २०२२ पर्यंत तीन हजार ९९६ कोटी रुपयांचे कर्जवाटप (Crop Loan) झाले आहे. खरीप हंगामामध्ये नियोजित असलेले पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यात आले आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात १०१ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत देण्यात आली.

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अग्रणी बँकेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी वार्षिक पत आरखड्याच्या उद्दिष्ट साध्यतेबाबत माहिती दिली. बँकानी या वर्षी खरीप हंगामामध्ये १०१ टक्के पीककर्जाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.

तसेच जिल्ह्याचा वर्षीचा पत आराखडा ४ हजार ३५० कोटी रुपयांचा आहे. सप्टेंबर २०२२ पर्यंत ३ हजार ९९६ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. ९२ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. प्राथमिकता प्राप्त क्षेत्रामध्ये चार हजार ९५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, सप्टेंबर अखेरपर्यंत २ हजार ६०० कोटी रुपये म्हणजे ६३ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये यावर्षी ७ लाख ६ हजार ४०० तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये १ लाख ४३ हजार ८६४ नागरिकांनी विमा काढला आहे.जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी विमा योजना लोकहितकारी आहे.

याचा प्रीमियम प्रत्येकी २० रुपये आणि ४३६ रुपये असून, तो अत्यंत कमी आहे. प्रत्येकी विमा रक्कम दोन लाख रुपये आहे. त्यामुळे ही योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केली. तसेच पंतप्रधान मुद्रा योजना व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनांमध्ये बँकानी उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: आंबा, काजू बागायतदारांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखला

PAN Card Rules: पॅन कार्ड प्रक्रियेत मोठे बदल; १ एप्रिलपासून नवे नियम लागू, जाणून घ्या माहिती

Sugarcane FRP: सांगलीतील १० कारखान्यांकडे २८० कोटी एफआरपी थकीत

Agrowon Podcast: टोमॅटोचा बाजार दबावात; सोयाबीन टिकून, कापूस स्थिर, कारली आवक वाढली तर गवारचे दर तेजीत

Crop Loan Repayment: शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाची परतफेड करावी लागत आहे का?; सहकारमंत्र्यांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT