Wet Drought Agrowon
ताज्या बातम्या

Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करण्याची ‘आप’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांकडून विमा रकमेपोटी हजारो रुपये भरूनसुद्धा झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळालेला नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात, ही विस्ताविकता सरकारला माहिती आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ(Wet Drought) जाहीर करून प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) द्यावी. पीकविमा (Crop Insurance) कंपनीला सरसकट पीकविमा देणे अनिवार्य करावे, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम द्यावे, शेतीला दिवसा १२ तास वीजपुरवठा (Power Supply) करावा, थकीत वीजबिले व शेतीचे कर्ज माफ करावे अशा विविध मागण्या आम आदमी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

शेतकऱ्यांकडून विमा रकमेपोटी हजारो रुपये भरूनसुद्धा झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळालेला नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात, ही विस्ताविकता सरकारला माहिती आहे. तसेच राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा फारच खालावला आहे.

त्यामुळे शाळांमधील पट संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यावर सुधारणा होणे अपेक्षित होते. परंतु सरकारने कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही आम आदमी पक्षाने म्हटले आहे. पश्‍चिम विदर्भ संयोजक तथा राज्य कमिटी सदस्य शेख अन्सार, जिल्हा संयोजक अरविंद कांबळे, महानगर संयोजक डॉ. खंडेराव दाभाडे यांच्यासह कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता

Soybean Market : ओलाव्याच्या कारणाआड सोयाबीन दर दबावात

Inter Cropping : रब्बीमध्ये आंतरपीक पद्धती ठरते फायदेशीर

Paddy Harvesting : डहाणूत भातपीक कापणीला वेग

Bio Gas Plant : आधुनिकतेमुळे गोबर गॅस होतोय कालबाह्य

SCROLL FOR NEXT