रत्नागिरी ः जिल्ह्यात होणाऱ्या २२२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली. त्यात सरपंचपदाचे (Sarpanch Nomination) सहा तर सदस्यपदाचे १६ असे एकूण २२ अर्ज अवैध ठरले. वैध ठरलेल्या अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बुधवारपर्यंत (ता. ७) मुदत आहे. त्यानंतर राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १८ डिसेंबरला होत आहेत. या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांच्या अर्जांची सोमवारी (ता. ५) छाननी झाली. यामध्ये सरपंचपदासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांपैकी चिपळूण व संगमेश्वरमध्ये प्रत्येकी दोन तर रत्नागिरी व लांजामध्ये प्रत्येकी एक अर्ज बाद ठरला. तर सदस्यपदाचे जिल्ह्यात १६ अर्ज बाद झाले आहेत.
यामध्ये दापोली १, चिपळूण २, रत्नागिरी ७ तर राजापूरमध्ये ६ अर्ज बाद ठरले आहेत. मंडणगड सरपंचपदासाठी ४४ तर सदस्यपदासाठी १९३, दापोलीत सरपंचपदासाठी ८५ तर सदस्यासाठी ३०५, खेडमध्ये सरपंचपदासाठी ३४ तर सदस्यपदासाठी १२४, चिपळूणमध्ये सरपंचपदासाठी ६८ तर सदस्यपदासाठी ३०१, गुहागरमध्ये सरपंचपदासाठी ५१ तर सदस्यपदासाठी २५२, संगमेश्वरमध्ये सरपंचपदासाठी ११३ तर सदस्यपदासाठी ४०२, रत्नागिरीत सरपंचपदासाठी ८५ तर सदस्यपदासाठी ४२२, लांजात सरपंचपदासाठी ५४ तर सदस्यपदासाठी २२० व राजापूरमध्ये सरपंचपदासाठी १०३ तर सदस्यपदासाठी ३८७ अर्ज वैध ठरले आहेत.
उमेदवारी अर्ज करणाऱ्यांना बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले किती उमेदवार माघार घेतात, कोणकोणाशी हातमिळवणी करणार याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले होते.
काही ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध असताना सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे तर काही ठिकाणी सरपंच, सदस्य बिनविरोध करताना एखाद्या जागेसाठीही निवडणूक होत असल्याने, अशा ग्रामपंचायतींकडेही राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.