Elephant Rampage Agrowon
ताज्या बातम्या

Elephant Rampage : हत्तींना हटविण्यासाठी पश्‍चिम बंगालचे पथक जूनमध्ये सिंधुदुर्गात येणार

Wild Animal Crop Damage : हत्तींना रोखण्याचे बहुतांशी पर्याय कुचकामी ठरल्यानंतर आता वनविभागाने हत्तींना नैसर्गिक अधिवासात हटविण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या विशेष हाकारी पथकाला पाचारण केले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : हत्तींना रोखण्याचे बहुतांशी पर्याय कुचकामी ठरल्यानंतर आता वनविभागाने हत्तींना नैसर्गिक अधिवासात हटविण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या विशेष हाकारी पथकाला पाचारण केले आहे. हे पथक जूनच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्गात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.

तिलारी खोऱ्यातील अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर असतो. हत्तींच्या कळपाकडून सतत शेती, बागायतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. हत्तींना हटवावे यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली.

वनविभागाने देखील विविध उपाययोजना केल्या. परंतु त्यात अपेक्षित यश वनविभागाला आलेले नाही. दरम्यान मोर्ले, केर, घोटगेवाडीसह अन्य गावांतील शेतकऱ्यांनी हत्तींचा बंदोबस्त करा, अन्यथा २५ मेपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा वनविभागाला दिला होता.

त्या अनुषंगाने वनविभागाने हत्तींना नैसर्गिक अधिवासात हटविण्यासाठी पश्‍चिम बंगालच्या हाकारी पथकाला पाचारण केलेले आहे. हे पथक जूनच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्गात दाखल होणार आहे. त्यानंतर हत्तींना नैसर्गिक अधिवासात नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन वनक्षेत्रपाल अरूप कन्नमवार यांनी शेतकऱ्यांना दिले.

याशिवाय पंचनाम्यातील जाचक अट्टी रद्द करण्यात येतील, हत्तींचा वावर असलेल्या गावांमध्ये २४ तास कर्मचारी नेमण्यात येतील. गावात अधिकाऱ्यांची यादी आणि त्यांचे मोबाइल क्रमांक प्रसिद्ध करण्यात येतील, अशी आश्‍वासने देखील श्री. कन्नमवार यांनी शेतकऱ्यांना दिली. त्यामुळे २५ रोजी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांनी स्थगित केले. सरपंच गोपाळ गवस, संतोष मोर्ये यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDKV Garlic Planter: दुष्काळात लसूण लागवडीत बियाण्याची बचत करा; पीडीकेव्हीचे टोकण यंत्र ठरेल फायदेशीर

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

SCROLL FOR NEXT