Radhakrushna Vikhe Patil Agrowon
ताज्या बातम्या

RadhaKrushna Vikhe Patil : वाळूबाबत लवकरच नवे धोरण राबवणार

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः ‘‘राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू माफियांनी थैमान घातले आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. वाळू चोरीमुळे शासनाचा महसूलही (Government Revenue) बुडतो आहे. त्यामुळे राज्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी लवकरच राज्य सरकार वाळूबाबत नवे धोरण राबविणार आहे,’’ अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दिली.

पालकमंत्री विखे-पाटील नुकतेच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी पंढरपूर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखे-पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होत आहे. तसेच नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडत असल्याने यात्रा काळात या खड्ड्यांतील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.’’

‘‘वाळू लिलाव नसताना जिल्ह्यातील अथवा राज्यातील कोणत्या ही भागात वाळू चोरी होत असेल, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. तसेच त्या ठिकाणी कार्यरत असणारे तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करावी, अशा सूचनाही राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत,’’ असे विखे-पाटील यांनी सांगितले.

धोरण ठरविण्यासाठी समिती

राज्य सरकार आता वाळूबाबत लवकरच नवे धोरण राबविणार आहे. त्यासाठी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती देशातील इतर राज्यांतील वाळू धोरणाचा अभ्यास करणार आहे. तसेच त्यांनी सूचना केल्याप्रमाणे वाळू लिलाव आणि विक्रीबाबत लवकरच नवे धोरण राबविणार असल्याची माहितीही विखे -पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Farmers: सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवा 

Banana Price Crash: निर्यातक्षम केळीस १५ ते २० रुपये दर

MSP Procurement: हमीभावाने १५ पासून खरेदी

Space Farming: चंद्रावरही शेती शक्य होणार; नॅनोतंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे प्रयोग सुरु

Tractor Emission Norms: ‘ट्रेम ५’ मुळे ट्रॅक्टर होतील अधिक पर्यावरणपूरक

SCROLL FOR NEXT