Tribal Farmer Agrowon
ताज्या बातम्या

Tribal Farmer : आदिवासी मूळचा मालक असूनही भूमिहीन शेतकरी

जल,जमीन व जंगल सांभाळणारा आदिवासी भिल्ल समाज हा खरा मालक असूनही आज तो भूमिहीन झाला असून, उदरनिर्वाहासाठी सातत्याने स्थलांतरित होत आहे.

टीम ॲग्रोवन

नगर : जल,जमीन व जंगल सांभाळणारा आदिवासी (Tribal Farmer) भिल्ल समाज हा खरा मालक असूनही आज तो भूमिहीन झाला असून, उदरनिर्वाहासाठी सातत्याने स्थलांतरित (Tribal Migration) होत आहे. आदिवासी शेतकरी (Tribal Farmer), शेतमजुरांना हक्क मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना संघर्ष करेल, असे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.

नेवासा येथे आदिवासी प्रबोधन सेवा संघ व तंट्या ब्रिगेडतर्फे आदिवासी शेतकरी व शेतमजूर मेळावा झाला. अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस ॲड. बन्सी सातपुते हे होते.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे, क्रांतिसिंह नानापाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीनाना नांदखिले, शेतकरी संघटनेचे नेते व राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे, आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगड, विठ्ठल माळी, देविदास पवार, नारायण बर्डे, संजय पवार, त्रिंबक भदगले उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे जमिनीचा सातबारा झालाच पाहिजे. अनेक भूमिहीन आदिवासी बांधव आपले कुटुंब पोसण्यासाठी नदी,बंधारे व तलावांवर मच्छीमारी व्यवसाय करीत आहेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT