Herd Of Elephants Agrowon
ताज्या बातम्या

Wild Elephants : कुंभवडेत हत्तींचा कळपाने केले फळबागाचे नुकसान

Herd Of Elephants : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुंभवडे (ता. दोडामार्ग) येथील अर्जुन गावडे यांच्या घरालगत हत्तींच्या कळपाने केळी, सुपारीचे नुकसान केले.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोर्ले (ता. दोडामार्ग) येथे गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य असलेल्या चार हत्तींचा कळप आता कुंभवडेत दाखल झाला आहे. या हत्तींनी थेट वस्तीत शिरत नारळ, सुपारी, केळी बागायतींचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

दोडामार्ग तालुक्यात हत्तीचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे. तिलारी खोऱ्यातील अनेक गावांत हत्तीचा वावर असतो. गेल्या काही दिवसांपासून मोर्ले गावात हत्तीचे वास्तव्य होते. या गावातील शेती, बागायतीचे हत्तीच्या कळपाने मोठे नुकसान केले. त्यामुळे हत्तीबाधित गावातील शेतकऱ्यांनी हत्ती हटाव मोहीम राबविण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मात्र कोणतीही कार्यवाही शासनस्तरावर झालेली नाही.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मोर्लेत वास्तव्यास असलेला हत्तीचा कळप दोडामार्ग आणि कुंभवडे गावांत दाखल झाला आहे. त्यांनी नारळ, सुपारी, केळी आणि भातपिकांचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. हत्ती लोकवस्तीत येऊन नुकसान करीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. घरालगतचे संरक्षक कटडे पाडून हत्ती नुकसान करीत आहेत. दरम्यान कुंभवडे येथील अर्जुन गावडे, चंद्रकांत कांबळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सध्या हत्ती कुंभवडे येथे आहेत. हे गाव सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन तालुक्यांच्या हद्दीवर आहे. त्यामुळे हत्तींचा कळप सावंतवाडी तालुक्यातील गावांकडे वळला तर मोठे नुकसान करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत हत्तीची वाटचाल पाहता हत्ती भेकुर्ली, तळकट, केर, झोळंबे या गावांच्या दिशेने जाण्याची अधिक शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT