leopard
leopard Agrowon
ताज्या बातम्या

चास परिसरात पिंजरा लावावा

ॲग्रोवन वृत्तसेवा

मंचर : चास (ता. आंबेगाव) येथे मेंढपाळाच्या वाड्यावर दोन बिबट्यांनी (leopard) केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा (Goat) मृत्यू झाला आहे. तर चार मेंढ्या जखमी झाल्या आहेत. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी येथील शेतकरी (Farmer) करीत आहेत.
चास येथे मेंढपाळ नाथा जिजाबा ठोंबरे यांचा शेळ्या (Goat) आणि मेंढ्यांचा वाडा दौलत बारवे यांच्या शेतात मुक्कामी होता. रात्री साडेआठ वाजता कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आल्याने ठोंबरे यांनी बाहेर पाहिले असता दोन बिबट्यांनी (leopard) त्यांच्या पशूधनावर हल्ला केला. यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र, बिबट्याच्या (leopard) या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. ४ मेंढ्या जखमी झाल्या. यात ठोंबरे यांचे अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. वनरक्षक प्रदीप औटी, वनमजूर सोपान वाळूज यांनी पंचनामा केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sericulture Farming : एकेकाळी केली रोजंदारी रेशीम उद्योगातून घेतली भरारी

12th (HSC) Result : १२ वीचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के! कोकणाची बाजी, सर्वात कमी निकाल मुंबईचा

Agriculture Produce : केंद्र सरकार शेतमालाच्या परराज्य खरेदी-विक्रीसाठी करणार कायदा ?

Kolhapur Water Level : कोल्हापूर जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट, तब्बल दोन मीटरने पाणी गेलं खाली

Dairy Business : नोकरी सोडून युवक रमला दुग्ध व्यवसायात

SCROLL FOR NEXT