Forest Land Agrowon
ताज्या बातम्या

Forest Land : त्र्यंबकेश्‍वरचे ९७ किमी क्षेत्र प्रतिबंधित जाहीर

नद्यांचे उगमस्थान असलेल्या डोंगरांची विल्हेवाट लावून कमाई करण्याचा सपाटा सुरू असलेल्या त्र्यंबकेश्‍वर आणि इगतपुरी भागात वन विभागाच्या जागा संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

नाशिक : नद्यांचे उगमस्थान असलेल्या डोंगरांची विल्हेवाट (Hills Demolition) लावून कमाई करण्याचा सपाटा सुरू असलेल्या त्र्यंबकेश्‍वर आणि इगतपुरी भागात वन विभागाच्या (Forest Department) जागा संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाल्या आहेत. त्यात त्र्यंबकेश्‍वरचे ९७ किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाल्याने डोंगर उत्खननातून जलस्रोत गायब करण्याच्या भू-माफियागिरीला (Land Mafia) आळा बसण्याची आशा वाढली आहे.

त्र्यंबकेश्‍वर शिवाय कळवण आणि इगतपुरी तालुक्यांतील संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यात त्र्यंबकेश्‍वरच्या ब्रह्मगिरीसह ९७ किलोमीटर, कळवण तालुक्यातील गुजरातलगतच्या भागासह ८४.१२ चौरस किलोमीटर संरक्षित क्षेत्र जाहीर झाले आहे.

त्यात गुजरात राज्याच्या हद्दीला लागून सुरू होणाऱ्या कळवण क्षेत्रात संरक्षित क्षेत्रात समावेश झाला आहे. कळवण तालुक्यातील देसरणे, रळवजी, नाकोडे, एकलहरे, वाडी, बालापूर, जामळे, ढेकाळे यांसह २८ गावांतील क्षेत्राचा समावेश आहे. इगतपुरी तालुक्यातील ८८.४९ चौरस क्षेत्राचा परिसर संरक्षित म्हणून जाहीर झाला आहे.

इगतपुरी संवर्धन राखीव क्षेत्रात भावली धरण परिसरासह सातुर्ली, ओडली, नागोसली, वालविहीर, धारगाव, चिंचला खैरा, त्रिंगलवाडी, पिंपळगाव भटाटा, धानोली, बोरटेंभे, पारदेवी, गिरणारे, इगतपुरी, तळोशी, भावली, आंबेवाडी, कुरुंगवाडी, मानवेढेसह साधारण ८८४९.९४८ हेक्टर (८८.४९) चौरस किमी क्षेत्र संरक्षित जाहीर झाले आहे.

ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी कामांचे प्रस्ताव

त्र्यंबकेश्‍वर भागातील मेटघर किल्ल्यासह अनेक महत्त्वाचा भाग प्रतिबंधित संरक्षित क्षेत्रात समाविष्ट झाला आहे. मात्र त्याचवेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी नेमक्या त्याच भागात ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी कोट्यवधींच्या कामांचे प्रस्ताव भरले आहेत. पालिकेसह स्थानिक आमदारांनी गंगाद्वारच्या पायथ्याशी समाजमंदिरासारखी कामे सुचविली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj: राज्यात थंडी कायम; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानातील घट कायम

Colostrum Feeding: चीकाचे योग्य नियोजन जपते वासराचे आरोग्य

Single Women Survey: बुलडाणा जिल्ह्यात सर्व्हेक्षणात ८४,०७५ एकल महिलांची नोंद

Agriculture Success Story: गवारीच्या खेळत्या पैशाने दिला मोठा आधार

Local Body Result: बुलडाण्यात नगराध्यक्षपदांवर भाजप, काँग्रेसचे वर्चस्व

SCROLL FOR NEXT