Land Record Agrowon
ताज्या बातम्या

Bhumi Abhilekh Department : ‘भूमी अभिलेख’ला ९५ कोटींचा महसूल

पुणे विभागात २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षात विविध मोजणीची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे आणि निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांचा आढावा भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

Team Agrowon

Pune News ‘‘गेल्या वर्षभरात पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील मोजणी, सनद, प्रॉपर्टी कार्डाच्या नकला यातून ९५ कोटी ६२ लाख रुपयांचा महसूल (Revenue) मिळाला आहे,’’ अशी माहिती भूमी अभिलेख विभाग (Bhumi Abhilekh Department) पुणेचे उपसंचालक अनिल माने यांनी दिली.

पुणे विभागात २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षात विविध मोजणीची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे आणि निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांचा आढावा भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

पुणे विभागाच्या भूमापन विभागाकडे ३१ मार्च २०२२ पूर्वी ४८ हजार ६७० मोजण्यांची प्रकरणे शिल्लक होती. या वर्षभरात ६८ हजार ६०३ मोजणीची प्रकरणे नव्याने आली.

त्यामुळे १ लाख १७ हजार २७३ मोजणी प्रकरणांपैकी ८१ हजार ३६७ मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यात आली.

३५ हजार ९०६ मोजणी प्रकरणे अद्याप शिल्लक आहेत. सहा महिन्यांतील मोजणीची प्रकरणे निकाली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, अशी माहिती माने यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT