Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : खानदेशात ८५ टक्के पेरण्या पूर्ण

Kharif Season 2023 : खानदेशात ६ जुलैनंतर पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या. पेरणीची आकडेवारी वाढली असून, ८५ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ६ जुलैनंतर पावसाने हजेरी लावल्याने रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या. पेरणीची आकडेवारी वाढली असून, ८५ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत.

धुळे, जळगाव व नंदुरबारात सुमारे १४ लाख हेक्टरवर पेरण्या अपेक्षित आहेत. जूनमध्ये पेरण्या पाऊस नसल्याने रखडल्या होत्या. पिके मोडून नव्याने पेरण्या करण्याची गरज फारशी पडली नाही.

परंतु पेरण्या उशिरा झाल्या आहेत. कोरडवाहू कापूस लागवड कमी असून, ही लागवड सुमारे सहा लाख हेक्टरवर खानदेशात झाली आहे. खानदेशात एकूण कापूस लागवड साडेआठ लाख हेक्टरवर अपेक्षित आहे. सोयाबीनची पेरणीदेखील बऱ्यापैकी आहे. पण उडीद, मुगाची पेरणी कमी झाली आहे.

काही शेतकऱ्यांनी कापसाची लागवड टाळून सोयाबीनची पेरणी केली आहे. जोखीम घेऊन लवकर उत्पादन देणाऱ्या सोयाबीन वाणांची पेरणी अनेकांनी केली आहे. खानदेशात पेरण्या ८५ टक्के क्षेत्रात पूर्ण झाल्या आहेत. पेरणीची आकडेवारी मागील आठवड्यात ७२ टक्के एवढी होती. ६ जुलैनंतर पाऊस बरसत आहे.

मध्यंतरी काही दिवस पावसाचा खंड होता. जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वासहा लाख हेक्टरवर, धुळ्यात साडेतीन लाख आणि नंदुरबारात दोन लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. इतर पिकांच्या तुलनेत कोरडवाहू कापसाची लागवड अधिक आहे सोयाबीनची पेरणीदेखील अपेक्षेपेक्षा आहे.

कारण पेरणीचा कालावधी किंवा मुदत संपत असतानाच चांगला पाऊस झाला. तोपर्यंत अनेकांनी मका, कापसाची लागवड केली होती. पेरणी करतानाच रासायनिक खतेही सोयाबीन, मका पिकाला दिली आहेत.

तागाची पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. परंतु तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीच्या लाभक्षेत्रात पेरणी होईल. ही पेरणी पुढील आठवड्यात सुरू होऊ शकते. पेरणीला गती आली आहे. परंतु १०० टक्के पेरणी यंदा होणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Kumar Saptarshi Tribute: डॉ. सप्तर्षींचा विचार अखंडपणे जपणे गरजेचेच शरद पवार यांचे आवाहन

Drone Pilot Training MOU: ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ‘वनामकृवि’चा ‘सारथी’सोबत करार

Goat Deformity Case: गौंडगाव येथील बोकडामध्ये दिसली दुर्मीळ नैसर्गिक विकृती; पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञाकंडून तपासणी

Uddhav Thackeray: अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले : उद्धव ठाकरे

Women Farmers Empowerment Council: राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन

SCROLL FOR NEXT