Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Plantation : मावळमध्ये भातरोपांच्या ८० टक्के पूनर्लागवडी

Kharif Sowing : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे ८० टक्के भातरोपांच्या पुनरलागवडी झाल्या आहेत.

Team Agrowon

Pune News : ‘‘मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसामुळे ८० टक्के भातरोपांच्या पुनरलागवडी झाल्या आहेत. पाऊस असाच चालू राहिला तर पुढील आठ ते दहा दिवसात भातलागवडी पूर्ण होतील, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मावळ तालुक्यात भात लागवड क्षेत्र १३ हजार ५०० हे आहे. त्यापैकी आतापर्यंत दहा हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे. यावर्षीचा तालुक्यात खरीप हंगाम दरवर्षीपेक्षा उशिराने सुरु झाला. मॉन्सूनचे आगमन जूनच्या अखेरीस झाली. भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामाला देखील विलंबाने सुरुवात झाली.

पावसाने जूनमध्ये खंड दिल्याने भातरोपे पुनर्लागवडीसाठी उशिरा तयार झाली. पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय झाल्यानंतर भातरोपांची पुनर्लागवड करायला सुरवात झाली. भात लागवडी चालू झाल्यानंतर पाऊस अखंडपणे चालू असल्याने भात लागवडी अंतिम टप्प्यात आहेत.

मावळ तालुक्यात या वर्षी खरीप हंगाम नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी गावोगावी प्रशिक्षण, मेळावे, बीजप्रक्रिया मोहीम, चारसूत्री एसआरटी भात लागवडीवर मार्गदर्शन करण्यात आले.

तालुक्यात पवनमावळ, नाणे मावळ, आंदरमावळ भागात भात लागवडी पुढील आठ ते दहा दिवसांत पूर्ण होतील. तालुक्यात चारसूत्री पद्धतीने चार हजार ५०० हेक्टर, एसआरटी पद्धतीने २०० हेक्टर, यांत्रिकीकरण ५० हेक्टर, पट्टा पद्धतीने २५ हेक्टर क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने भात लागवड होते.

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी भातपीक मार्गदर्शन प्रशिक्षण व मेळावे घेण्यात आले. बीजप्रक्रिया मोहीम राबविण्यात आली. चारसूत्री, एसआरटी पद्धतीने शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत. मावळ तालुक्यात चारसूत्री भात लागवड क्षेत्र वाढले आहे.
- विकास गोसावी, कृषी सहाय्यक, पवनामावळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार; राज्यात पावसाचा जोर पुढील ५ दिवस कमीच राहणार

Fake PM Kisan Link : शेतकऱ्यांनो, खोट्या मेसेज अन्‌ लिंकपासून सावध राहा

Heavy Rain Marathwada : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील ७३ मंडलांत धो-धो पाऊस

7/12 Land Records: सातबारा उताऱ्यावरील नोंदींसाठी नवीन नियंत्रण कक्ष; आता एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही

Swamitva Yojana : बासष्ट हजार जणांना मिळाली मिळकत पत्रिका

SCROLL FOR NEXT