Onion Market Agrowon
ताज्या बातम्या

Onion Subsidy : राज्यातील ७० टक्के शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित

Onion Rate : राज्य सरकारने कांदा अनुदान प्रतिकिलो साडेतीन रुपये जाहीर केले पण त्यामध्ये शेतकऱ्यांना असंख्य अडचणी आलेल्या आहेत.

Team Agrowon

Pune News : ‘‘राज्य सरकारने कांदा अनुदान (Onion Subsidy) प्रतिकिलो साडेतीन रुपये जाहीर केले पण त्यामध्ये शेतकऱ्यांना असंख्य अडचणी आलेल्या आहेत. याचा विचार सरकारने अद्याप केला नाही. त्यामुळे राज्यातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत.

राज्य शासनाने लागू केलेल्या जाचक अटी त्वरित रद्द करून, कांदा उत्पादकांना न्याय द्यावा,’’ अशी मागणी मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी केली आहे.

अनुदानाबाबत निकम यांनी राज्य सरकारला निवेदन पाठविले आहे. राज्य शासनाची कांदा अनुदान योजना २०२२-२३ नुसार ता. १ फेब्रुवारी २०२३ ते ता.३१ मार्च २०२३ या कालावधीत बाजार समितीत ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेली आहे.

त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटलला ३५० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांस २०० क्विंटलपर्यंत कांदा अनुदानाची मर्यादा ठेवली आहे. सोमवार (ता. ३) ते गुरुवार (ता. २०)पर्यंत शेतकऱ्यांनी कांदा अनुदान अर्जाची पूर्तता करून बाजार समितीत अर्ज सादर करावेत.

सोबत शेतकऱ्यांनी कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा देणे बंधनकारक केले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाची ई-पीकपाहणीची नोंद करण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अनेक शेतकऱ्यांकडे अॅण्ड्रॉइड मोबाइल तसेच अॅप नाही. अनेक गावांमध्ये, शेतामध्ये, डोंगरी भागात मोबाईल नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक नोंद करता येत नाही. परिणामतः शेतकऱ्यांना कांदा अनुदान अर्ज सादर करता येत नाहीत.

वंचित राहिलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध होण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा केला जाईल, असा निवेदनात उल्लेख आहे.

सर्वच बाजार समित्यांमध्ये ३१ मार्चपर्यंत विक्रमी कांदा पिशव्यांची आवक झाली. त्यामुळे बाजारभाव कोसळले. त्याचाही फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने व सहकारी सोसायट्यांच्या कर्जाचे हप्ते भरता येत नसल्याने शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे. त्यासाठी राज्य सरकारने १ फेब्रुवारी २०२३ ते रविवारपर्यंत (ता. ३० एप्रिल) बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे.
- देवदत्त निकम, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Market : सोयाबीन यंदा तरी शेतकऱ्यांना हात देणार का?

Maharashtra Governor: आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल

Agriculture Investment : शेतीसाठीची गुंतवणूक आणि निविष्ठा अनुदान

Heavy Rain Alert : राज्यात आज पाऊस दणका देणार ; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज तर राज्यभरात येलो अलर्ट

Agricultural Trade : भारत १४० कोटी लोकांचा देश तरीही आमच्याकडून एक पोत मका घेत नाही?; ट्रम्प यांच्या मंत्र्याचा सवाल

SCROLL FOR NEXT