Gram Panchayat Elections Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : सरपंच पदासाठी ६१४ उमेदवार रिंगणात

जिल्ह्यात २१६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होते आहे. या निवडणुकीच्या रिंगणात सरपंच पदासाठी ६१४ तर सदस्य पदासाठी ३६९० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यात २१६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक (Gram Panchayat Election) होते आहे. या निवडणुकीच्या रिंगणात सरपंच पदासाठी ६१४ तर सदस्य पदासाठी ३६९० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थेट सरपंच पदासाठी १०९२ तर सदस्य पदासाठी ५४८१ असे ६५७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

त्यापैकी ३७१ जणांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले तर १९३८ जणांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सरपंच पदासाठी ६१४ तर सदस्य पदासाठी ३६९० असे ४३०४ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २१९ ग्रामपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली होती.

परंतु गंगापूरच्या तीन ग्रामपंचायतीवर आक्षेप असल्याने त्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करून उर्वरित २१६ ग्रामपंचायतीसाठी २८ नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये २ डिसेंबरपर्यंत थेट सरपंच पदासाठी १०९२ आणि सदस्य पदासाठी ५४८१ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. ५ डिसेंबरला छाननी प्रक्रिया राबविण्यात आली.

ऑनलाइन व नंतर ऑफलाईन असे अर्ज स्वीकारण्यात आल्याने छाननी दरम्यान, अनेक अडचणी उद्भवल्या. त्यामुळे छाननीचा कालावधी एक दिवसांनी वाढवला होता. ६ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत छाननीची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर ७ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया झाली.

त्यातही अडचणी आल्याने या प्रक्रियेसाठी देखील आयोगाने जिल्हा प्रशासनाला वेळ वाढवून दिला. गुरुवारी संपूर्ण प्रक्रियेची माहिती अंतिम करण्यात आली. त्यानुसार २१६ ग्रामपंचायतच्या निवडणूक रिंगणात थेट सरपंच पदाच्या ४४१ आणि सदस्य पदाच्या १४५७ उमेदवारांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे थेट सरपंच पदासाठी आता निवडणूक रिंगणात ६१४ तर सदस्य पदासाठी ३६९० उमेदवार उरले आहेत.

तालुकानिहाय सरपंच व सदस्य पदासाठीचे उमेदवार

तालुका सरपंच पदासाठी सदस्य पदासाठी

औरंगाबाद १०० ५७७

पैठण ६० ४८१

फुलंब्री ४९ ३२१

सिल्लोड ५४ ३५२

सोयगाव ११ २६

कन्नड १४० ८३३

खुलताबाद २९ २००

वैजापूर ७९ ३८२

पैठण ९२ ५१८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT