Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पीक नुकसान भरपाईसाठी ५९७ कोटींची मंजुरी

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात सततच्या पावसाने पिकाचे नुकसान (Crop Damage) झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी म्हणून ५९७ कोटी ५४ लाख ३ हजार रुपयांचा निधी वितरणास शासनाने (Government Aid) मंजुरी दिली आहे. याबाबत गुरुवारी (ता. १३) शासन आदेश जाहीर करण्यात आले.

नुकसान भरपाईच्या निकषात न बसणाऱ्या मात्र सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु यासंबंधी शासन निर्णय प्रलंबित होता.

तो आता शासन स्तरावरून जाहीर झाला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने जून ते ऑगस्ट दरम्यान १० लाख ५९ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या ७ लाख ३८ हजार ७५० हेक्टरचे नुकसान केले. त्याची मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय गोगलगायीच्या आक्रमणाने १ लाख १८ हजार ९९६ शेतकऱ्यांच्या ७२ हजार ४९१ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले.

त्याचीही मदत पोहोचविली गेली. आजवर झालेल्या नैसर्गिक आपत्तीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ६५ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६४ प्रकरणात मदत देण्यात आली आहे. जवळपास ९९२१ कच्ची-पक्की घरे व गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. याशिवाय ११११ जनावरांचाही नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाला. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी मदत देणे बाकी होती.

मदत व पुनर्वसन विभागाने ७५५ कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील ९ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. येत्या काही दिवसांत हा निधी मिळणे अपेक्षित आहे. जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत सततच्या पावसाने बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने यातून दिलासा मिळणार आहे.

जिरायती पिकाच्या नुकसानीसाठी १३६०० रुपये प्रति हेक्टर, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर, तर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टरच्या मर्यादित ही मदत दिली जाणार आहे.

जिल्हानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टर) व जाहीर निधी

जिल्हा....शेतकरी...क्षेत्र... निधी (लाखांत)

औरंगाबाद १६४१... १२,६७९... १७५०.६१

जालना... ११५०... ६७८..... ९७.८१

परभणी... ४४८६... २५४५.१५... ३४६.१५

हिंगोली... १३४४०६... ९६६७७... १३२१४.९४

बीड... १६०.... ४८.८०.... १७.२१

लातूर....३४२०७१... २१३५१.... २९००२.१४

उस्मानाबाद... १४६३१०.. ११२६०९.९५..१५३२५.१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा भावावरील दबाव कायम; कापूस, सोयाबीन, तूर तसेच कांदा यांचे बाजारभाव काय आहेत ?

Sugar Production : साखर उत्पादन वाढले पाच लाख टनांनी, उतारा मात्र घटला

Electricity Issue : नियमित विजेची नागरिकांची मागणी

Soybean Seed Processing : सोयाबीन बीज प्रक्रियेवर जोर

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

SCROLL FOR NEXT