Agriculture  Agrowon
ताज्या बातम्या

मराठवाडा कृषी विद्यापीठात ५४.१७ टक्के पदे रिक्त

यंदाच्या जून अखेरपर्यंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामधील १ हजार ५६३ पदे (५४.१७ टक्के) पदे रिक्त आहेत.

माणिक रासवे

परभणी ः यंदाच्या जून अखेरपर्यंत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामधील (MArathwada Agriculture University) १ हजार ५६३ पदे (५४.१७ टक्के) पदे रिक्त आहेत. त्यात शिक्षकवर्गीय ७१६ पैकी ३२४ पदे (४५.२५ टक्के) आणि शिक्षकेत्तर २ हजार १६९ पैकी १ हजार २३९ पदांचा (५७. १२ टक्के) समावेश आहे. तोकड्या मनुष्यबळांमुळे (Manpower) शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य अडखळत सुरू आहे. पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. परिणामी, नवीन कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांना येत्या काळात अधिस्वीकृती कायम राखण्यासह राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठाच्या मानांकनात सुधारणा करण्यासाठी अनेक आव्हानांचा डोंगर पार करावा लागणार आहे.

कुलसचिव, शिक्षण संचालक, संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, प्राचार्य अत्यंत महत्त्वाची पदे रिक्त आहेत. परभणी कृषी विद्यापीठामधील मंजूर २ हजार ८८५ पदांपैकी १ हजार ५६३ पदे रिक्त आहेत. शिक्षक वर्गीय वर्ग अ ते क मधील ७१६ पैकी ३९२ पदे भरलेली तर ३२४ पदे रिक्त आहेत. विभागप्रमुखांची १० पैकी २ पदे, प्राचार्यांची १२ पैकी ११ पदे, सहयोगी प्राध्यापकांची १८३ पैकी ८६ पदे, सहाय्यक प्राध्यापकांची २८४ पैकी १२१ पदे रिक्त आहेत.

महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढली आहे. परंतु पदभरती नाही. संशोधन शाखेतील अनेक पदे रिक्त आहेत. पैदासकार शास्त्रज्ञांकडे अतिरिक्त पदभार आहे. विस्तार शिक्षण शाखेतील रिक्त पदांमुळे तंत्रज्ञानाच्या प्रसाराची गती कमी झाली आहे. यापूर्वीच्या कुलगुरूंचा कार्यकाळ अनेकबाबतीत वादग्रस्त राहिला. सुवर्ण महोत्सवी वर्षात विद्यापीठांचे राष्ट्रीय पातळीवरील मानांकन ४१ वरून ५१ व्या क्रमांकापर्यंत घसरले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेची अधिस्वीकृती २०२३ पर्यंत आहे.

त्यापुढे अधिस्वीकृती कायम राखण्यासाठी रिक्त पदांच्या भरतीसह अन्य प्रयोगशाळा, वसतिगृहे आदी शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करावे लागणार आहे. अन्यथा ‘आयसीएआर’कडून निधी मिळू शकणार नाही. हवामान बदल संशोधन केंद्रांस मंजुरी तसेच अन्य संशोधनासाठी निधीसाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न आहेत. वसतिगृहे, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, रस्ते दुरुस्तीस आले आहेत. या परिस्थितीत विद्यापीठ जास्तीजास्त शेतकरीभिमुख करण्यासाठी कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांना आव्हानातून मार्ग काढावा लागणार आहे.

दर महिन्याला कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने कामाचा ताण वाढला आहे. तत्काळ पदभरती करावी. आयसीएआर तसेच शासनाकडून निधी मिळाला पाहिजे.
प्रा. दिलीप मोरे, अध्यक्ष कर्मचारी संघ, वनामकृवि, परभणी

‘वनामकृवि’त मंजूर, रिक्त पदे स्थिती (जून अखेरपर्यंत)

गट...मंजूरपदे...भरलेलीपदे...रिक्तपदे..रिक्तपदांची टक्केवारी

अ...६०८...३१९...२८९...४७.५३

ब...१९०...११३...७७...४०.५२

क...७३४...३८९...३४५...४७.००

ड...१३८६...५०१...८८५...६३.८५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT