SMART Project Agrowon
ताज्या बातम्या

SMART Project : ‘स्मार्ट’मधून ५४ प्रकल्पांना मंजुरी

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांतील समुदाय आधारित संस्थांच्या ५४ प्रकल्प प्रस्तावांना जागतिक बँक अर्थसाहायित बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, अर्थात ‘स्मार्ट’च्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती ‘स्मार्ट’च्या विभागीय अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी उमेश घाटगे यांनी दिली.

‘स्मार्ट’मधून छत्रपती संभाजीनगर, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालया अंतर्गत तीन जिल्ह्यांत ९७ प्रकल्पांना मंजुरी देण्याचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ३१, जालनामधील २८ व बीडमधील ३८ उद्दिष्टांचा समावेश आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ६७ प्रस्ताव समुदाय आधारित संस्थांच्या माध्यमातून सादर केले गेले.

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २२, जालनामधील १७ व बीडमधील २८ प्रकल्प प्रस्तावांचा समावेश आहे. त्यापैकी ५४ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यात छत्रपती संभाजीनगरमधील १५, जालन्यातील १७ व बीड मधील २२ प्रकल्प प्रस्तावांचा समावेश आहे.

मंजूर प्रकल्पासाठी तीनही जिल्ह्यांतील १५ समुदाय आधारित संस्थांना आतापर्यंत ११ कोटी १४ लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४ सीबीओना १ कोटी ७५ लाख ३७ हजार, जालन्यामधील ४ सीबीओना ३ कोटी ३३ लाख ५३ हजार, तर बीडमधील ७ सीबीओना ६ कोटी ५ लाख रुपयांचा समावेश आहे, अशी माहिती घाटगे यांनी दिली.

आजवरच्या प्रकल्प प्रस्तावांमध्ये बहुतांश प्रकल्प शेतमाल क्लिनिंग ग्रेडिंगशी संबंधित जास्त आहेत. याशिवाय दोन फळप्रक्रिया प्रकल्प प्रस्तावही आहेत. अल्प, अत्यल्प भूधारक, कृषी उद्योजकांना डोळ्यासमोर ठेवून सर्वसमावेशक मूल्यसाखळी विकसित करत शेतमालाच्या किमतीत मूल्यवृद्धी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ग्राहकाने अदा केलेल्या रुपयांमध्ये उत्पादकाचा हिस्सा वाढविणे, मूल्य साखळीमध्ये सहभागी असलेल्या घटकांची कार्यक्षमता वाढविणे, सहभागी घटकांमध्ये समन्वय आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करणे, साखळीतील सर्व घटकांसाठी फायद्याचे वातावरण निर्माण करणे, मूल्य साखळी स्पर्धाक्षम बनविण्याचे प्रयत्नही केले जात असल्याचे घाटगे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT