Electric Bus
Electric Bus Agrowon
ताज्या बातम्या

Electric Bus : ‘एसटी’त भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक बस

टीम ॲग्रोवन

मुंबई : एसटी महामंडळाच्या (MSRTC) ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक, (Electric Bus) तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नव्या बसेस खरेदी करण्यासाठी आशियायी विकास बँकेकडून कर्ज घेण्यासही मान्यता देण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात ही बैठक झाली. नव्याने घेण्यात येणाऱ्या डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्याटप्प्याने ‘एलएनजी’मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक बसेस या वातानुकूलित असल्याने त्याचे सध्याच्या वातानुकूलित बसेसपेक्षा तिकिटदर कमी ठेवण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सीएनजी बसेससाठी चेसिस उपलब्ध होत नसल्याने आणि सीएनजी पंपांची कमी संख्या पाहता सीएनजीऐवजी दोन हजार डिझेल बसगाड्या वाहने एसटीच्या ताफ्यात घेण्यात येणार आहेत. तसेच पुणे व सांगली विभागांकरिता १८० बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत.

डिझेलवर धावणाऱ्या पाच हजार बसगाड्यांचे लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) इंधनामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. यामुळे डिझेलच्या प्रचलित दरापेक्षा २० ते २५ टक्के कमी दराने एलएनजीचा पुरवठा होणार आहे. शिवाय संपूर्ण बस वातानुकूलित असल्याने कमी पैशांमध्ये प्रवाशांना प्रवास करता येईल. हे काम पुरवठादार कंपनीकडून करण्यात येणार असून, सुरुवातीला यात महामंडळाला कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तिकिटासाठी संकेतस्थळ

ॲन्ड्राइडवर आधारित ईटीआय यंत्राद्वारे प्रवाशांना एसटी बसची तिकिटे मिळणार आहेत. डेबिट, क्रेडिट कार्ड, गुगल पे आदी ऑनलाइन पेमेंटद्वारे प्रवाशांना आता तिकिटे मिळणार आहेत. त्याशिवाय मोबाईल ॲप-संकेतस्थळाद्वारे आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महामंडळाचे आंतरसंवादी नवीन संकेतस्थळ करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. नवीन संकेतस्थळ तयार झाल्यानंतर चॅट बॉट, तक्रार निवारण सुविधा, बसेसचे अद्ययावत वेळापत्रक या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

‘काचा बदला, कोच दुरुस्त करा’

एसटी बसेसची रंगरंगोटी करून स्वच्छता ठेवा, फाटलेली आसने बदला, बसगळती रोखण्यासह फुटलेल्या काचा बदलून नव्याने लावा आणि एसटीच्या या पंचसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीला परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT