Agricultural University
Agricultural University Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural University : संशोधनासाठी विद्यापीठाला ५० लाख रुपये निधी मंजूर

Team Agrowon

परभणी ः नावीन्यपूर्ण संशोधनाकरिता परभणी कृषी विद्यापीठास (Agricultural University) ५० लाख रुपये निधी मंजूर करण्‍यात आला आहे. संशोधन एकाच संस्थेत केंद्रित न होता, विकेंद्रित स्वरूपात व्‍हावे हा आयोगाचा दृष्टिकोन आहे, अशी माहिती राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सचिव डॉ. नरेंद्र शाह यांनी दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्‍यातर्फे मंगळवारी (ता. २९) वैज्ञानिक संवाद कार्यक्रमात डॉ. शाह बोलत होते. अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले होते. माजी सचिव डॉ. ए. व्ही. सप्रे, शास्‍त्रज्ञ अधिकारी डॉ. नवीद पटेल, समन्‍वय अधिकारी प्राचार्य डॉ. उदय खोडके, डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. राजेश क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

डॉ. शाह म्हणाले, की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्‍या वापरातून समाजातील विविध समस्‍या व विकासात्‍मक कार्यासाठी आयोग स्‍थापना करण्‍यात आला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोग प्रयत्‍नशील आहे. डॉ. सप्रे म्‍हणाले, की आयोग सामाजिक आर्थिक विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्‍या अभिनव संशोधन प्रस्‍तावास निधी उपलब्‍ध करून देते.

याचा लाभ विद्यापीठातील आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना घेता येईल. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या पुढाकारातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्‍यात ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामंजस्‍य कराराची करार प्रस्‍तावांची देवाण-घेवाण कार्यक्रमात करण्‍यात आली. विविध महावि़द्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्‍यापक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनचा बाजार दबावात; कापूस, सोयाबीन, गहू, आले यांचे दर काय आहेत?

Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व वादळी पावसाचा दणका

APMC Market : व्यापाऱ्यांचा माल ओट्यांवर, तर शेतकऱ्यांचा रस्त्यावर

Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणात इतका पाणीसाठी शिल्लक, सांगलीकरांना पाणी मिळणार?

Maharashtra Rain : राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यात उन्हाचा चटकाही कायम; पावसाचा जोर वाढणार

SCROLL FOR NEXT