Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी पन्नास कोटींची मागणी

सोयगाव तालुक्यात ३३ हजार १२७ शेतकऱ्यांचे नुकसान

Team Agrowon

सोयगाव  ः अतिवृष्टीच्या (heavy rain) नुकसानीसाठी सोयगाव तालुक्यासाठी पन्नास कोटी ५९ लक्ष ६४ हजार एवढ्या अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. अनुदानाची (crop insurance) रक्कम मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले.

तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांच्या लागवडीखालील ४२ हजार तीनशे पंधरा हेक्टरपैकी ३७ हजार ३६८ हेक्टरवरील क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यासाठी पन्नास कोटी ५९ लक्ष ६४ हजार रुपये निधीची मागणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे.

तालुक्यात चारही मंडळात तब्बल ३३ हजार १२७ शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्यात बाधित झाले आहे. त्यामुळे निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल तालुका महसूल प्रशासन सज्ज झालेले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड, आदी कागदपत्रे संकलित करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.

सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसाचा कपाशी पिकांना सर्वाधिक ३२ हजार ६८८ हेक्टरवर फटका बसलेला आहे तर सोयाबीन दोन हजार ८३६ हेक्टर क्षेत्रात बाधित झाल्याचा अहवाल पाठविण्यात आल्याचे तहसीलदार जसवंत यांनी सांगितले.

ओल्या दुष्काळात समावेशाबाबत शंका
सोयगाव तालुक्याचा अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे आता तालुक्याचा ओल्या दुष्काळात समावेश होण्याची शक्यता कमी झालेली असून अतिवृष्टीच्या अहवालात केवळ अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरिपाच्या ९८ टक्के पेरण्या पूर्ण

Maharashtra Monsoon Rain: राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

Niphad Sugar Mill : ‘निसाका’चे भंगार विकून कोट्यवधींचा अपहार

Mosambi Disease: मोसंबी फळसड रोखण्याचे 3 सोपे उपाय

Nilanga Farmer Crisis : ‘कृषी’चा कारभार ‘रामभरोसे’

SCROLL FOR NEXT