Crop Insurance
Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : रब्बी पीकविम्याचे ४२ हजार प्रस्ताव

Team Agrowon

परभणी ः यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabbi Season) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) परभणी जिल्ह्यतील शेतकऱ्यांनी ४२ हजार १६३ विमा प्रस्ताव सादर केले आहेत. या शेतकऱ्यांनी १ कोटी ८९ लाख  ६४ हजार ३७१ रुपये विमा हप्ता भरला आहे. हरभरा, गहू, ज्वारी, भुईमूग या पिकांसाठी १२६ कोटी ४२ लाख ९४ हजार ५२५ रुपये एवढे विमा संरक्षण घेतले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा परभणी जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरंस कंपनी लि. या विमा कंपनीकडून रब्बी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठीची कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी अंतिम मुदत ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर आणि गहू आणि हरभरा या पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत  होती. उन्हाळी भुईमुगासाठी विमा प्रस्तावासाठी ३१ मार्च २०२३ ही अंतिम मुदत आहे. सामाईक सुविधा केंद्रामार्फत (सीएससी) ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ४२ हजार १६३ विमा प्रस्ताव सादर केले आहेत.

पीकनिहाय विमा प्रस्ताव, विमा हप्ता, संरक्षित रक्कम (कोटी रुपये)
पीक विमा प्रस्ताव .शेतकरी विमा हप्ता विमा संरक्षित रक्कम
हरभरा ३०८९६ १.५२ १५.४६
ज्वारी ५१७१ .०.१८४३ १२.२८
गहू ५९२३ ०.१८७९ १२.५२
भूईमूग १७३ ०.०४० ०.२७

-तालुकानिहाय विमा प्रस्ताव, विमा हप्ता (लाखांत), विमा संरक्षित रक्कम (कोटींत)
तालुका विमा
प्रस्ताव शेतकरी
विमा हप्ता विमा संरक्षित रक्कम
परभणी ११३१८ ५७.९८ ३८.६५
जिंतूर १६५३ ७.९३ ५.८८
सेलू २४९१ ११.४४ ७.६३
मानवत २९०६ १६.४४ १०.९६
पाथरी १८८७ १०.१८ ६.७८
सोनपेठ ५०४८ २४.३८ १.६२
गंगाखेड ६८४९ २३.१९ १५.४६
पालम ७२२३ २६.६३ १७.७५
पूर्णा २७८८ ११.४३ ७.६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT