परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील (PM Crop Insurance Scheme)मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमुळे (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) (Mid Season Adversary) झालेले नुकसान या जोखीम बाबींअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ८ मंडलांतील ७३ हजार ८१४ सोयाबीन उत्पादक (Soybean Producers) शेतकऱ्यांना ४० कोटी ७१ लाख १२ हजार रुपये एवढी अग्रिम विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास विमा कंपनीकडून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे, तंत्राअधिकारी महादेव लोंढे यांनी दिली. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील ८ महसूल मंडलांत २१ ते २६ दिवस पावसाचा दीर्घ खंड पडला होता. त्यामुळे राज्य शासनाचे अधिकारी विमा, कंपनीचे प्रतिनिधी यांनी सोयाबीन पीक परिस्थितीची संयुक्त पाहणी केली.
त्यानुसार या मंडलातील सोयाबीनच्या मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदाच्या सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे आढळून आले. त्यात झरी (ता. परभणी) मंडलात ५२ टक्के, सिंगणापूर (ता. परभणी) मंडलात ५३ टक्के, जांब (ता. परभणी) मंडलात ५३ टक्के, दूधगाव (ता. जिंतूर) मंडलात ५५ टक्के, रामपुरी (ता. मानवत) मंडलात ५३ टक्के, सोनपेठ (ता. सोनपेठ) मंडलात ५४ टक्के, माखणी (ता. गंगाखेड) मंडलात ५४ टक्के, चुडावा (ता. पूर्णा) मंडलात ५७ टक्के घट झाली. त्यामुळे पीकविमा योजनेतील प्रतिकूल परिस्थितीमुळेळे झालेले नुकसान या जोखीम बाबींअंतर्गत या आठ मंडलांतील शेतकऱ्यांना संभाव्य विमाभरपाई पैकी २५ टक्के अग्रिम रक्कम एक महिन्याच्या आत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला ९ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे दिले होते.
त्यानुसार या आठ मंडलांतील सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व ७३ हजार ८१४ शेतकऱ्यांना ४० कोटी ७१ लाख १२ हजार रुपये एवढी अग्रिम विमाभरपाई मंजूर करण्यात आली. संबंधित मंडलातील विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसांत सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे लोखंडे यांनी सांगितले.
मंडलानिहाय प्रतिहेक्टरी अग्रिम विमापरतावा दर, परतावा रक्कम (रुपयांत)
मंडल लाभार्थी शेतकरी प्रतिहेक्टरी विमा परतावा परतावा रक्कम कोटींत
सिंगणापूर ८०६८ ६३६३.१३ ४.८०
जांब १०९५३ ६३.९२.४४ ६.४०
झरी १०५३७ ६१९३.४४ ६.०१
दूधगाव ९१८४ .६४२१.८३ ५.१६
रामपुरी ६०६३ ६२४८.०९ ३.९९
सोनपेठ ६६०५ ६७६३.८५ ४.१६
माखणी १३६२६ ६६९७.१८ ५.८६
चुडावा ८७७८ ७०१८.६० ४.३१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.