Jalgaon Hatnoor Dam : राज्यात अद्याप पावसाने जोर धरला नसला तरी धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणातील साठा वाढत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. हतनूर धरण साठ्यात जोरदार पाऊस होत असल्याने पाठबंधारे विभागाकडून अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
आज (ता.०६) सकाळी १० वाजता उघडण्यात आले. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील मे आणि जून महिन्यात धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी होता. यामुळे पाणी कमी झाल्याने पावसावर अवलंबून राहण्याची वेळ आली होती.
महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तापी नदीला पूर आल्याने धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे भुसावळ शहरासह तापी नदीवर अवलंबून असलेल्या गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे.
पाऊस सुरूच असल्याने पाण्याची आवक वाढत असल्याने हतनूर प्रशासने धरणाचे चार दरवाजे उघडले आहे. त्यामुळे १३६.०० क्युमेक्स (४८०३) क्यूसेक विसर्ग तापी नदी पात्रता सोडण्यात येणार आहे.
यंदा निम्मे पर्जन्यमान घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीटंचाईच्या उपाययोजना सुरूच आहेत. जुलै महिना सुरू झाला, तरीही समाधानकारक पाउस नसल्याने ३१ गावांत ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
दरम्यान मागच्या आठवड्यात जळगावात २५.४, भुसावळ १८.९, यावल ३२.४, रावेर ४०.९, मुक्ताईनगर ३९.५, चोपडा : ३७, एरंडोल ४९.३, चाळीसगाव ४४.४, जामनेर २४.५, पाचोरा ४३.६, भडगाव ३५.४, धरणगाव २१.५, बोदवड १४.७, अमळनेर ५२.४, पारोळा ६७.८ अशी पावसाची नोंद झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.