Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : सातारा जिल्ह्यात ३४२ पशुधन मृत

लम्पी स्कीन आजाराने लागण होणाऱ्या जनावरांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३४२ पशुधन मृत झाले आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा : लम्पी स्कीन आजाराने (Lumpy Skin Disease)लागण होणाऱ्या जनावरांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३४२ पशुधन मृत (Livestock Death) झाले आहे. तसेच दोन हजार १२७ जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत.

महाबळेश्‍वर वगळता दहा तालुक्यांतील १५४ गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. आतापर्यंत पाच हजार ३६० जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला असून, ३४२ पशुधन मृत झाले आहे. तसेच, दोन हजार १२७ जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत.

लम्पी स्कीन आजाराला रोखण्यासाठी आजपर्यंत ९८.५० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. लम्पी स्कीनच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे, शासकीय पशुवैद्यकीय आणि तालुका लघू पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत.

२०व्या पशुगणनेनुसार जिल्‍ह्यातील गोवर्गीय पशुधनांची संख्या तीन लाख ५२ हजार ४३६ असून, आजअखेर तीन लाख ४७ हजार १०० पशुधनांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT