Water Stock Agrowon
ताज्या बातम्या

Water Stock Maharashtra : राज्यातील धरणांत ३० टक्के पाणीसाठा

Water Storage : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र पाच ते सहा महिन्यांत धरणांतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे.

सध्या राज्यातील एकूण दोन हजार ९९३ प्रकल्पांमध्ये सुमारे ४३४.२७ टीएमसी (१२,३०० दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी ३०.५३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात एक टक्क्याने घट झाली असल्याची स्थिती आहे.

राज्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी पाण्याची मोठी टंचाई भासली होती. त्यामुळे पाण्यासाठी शासनाला अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. गेल्या वर्षी उशिराने पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील प्रकल्पांमध्ये चांगले पाणी आले होते.

तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना आणि बोअरवेलला पाणी आले. मात्र काही भागांत पाण्याचा अतिउपसा होत असल्यामुळे फेब्रुवारीपासून अनेक गावामध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तर काही गावामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी पाण्याची काही प्रमाणात मागणी वाढली होती. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी झाली होती. गेल्या वर्षी याच काळात राज्यातील प्रकल्पामध्ये अवघा ३१.६३ टक्के एवढा पाणीसाठा होता. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.

कोकण विभागात ४०.५१ टक्के, नागपूर विभागात २९.६७ टक्के, अमरावती विभागात ३७.८५ टक्के, नाशिक विभागात २६.१६ टक्के, तर पुणे विभागात २३.६२ टक्के पाणीसाठा होता. तर सर्वाधिक पाणीटंचाई भासत असलेल्या औरंगाबाद विभागातील प्रकल्पामध्ये २९.६७ टक्के पाणीसाठा होता.

सध्या मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पामध्ये सर्वाधिक पाणीसाठा ठाणे विभागात झाला आहे. ठाणे विभागात ४३.८३ टीएमसी म्हणजेच ३५.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

अमरावती विभागात ५३.८२ टीएमसी म्हणजेच ४०.४९ टक्के, नागपूर विभागात ६५.३३ टीएमसी म्हणजेच ४०.१७ टक्के, नाशिक विभागात ६८.७२ टीएमसी म्हणजेच ३२.८२ टक्के, पुणे विभागात ११४.९६ टीएमसी म्हणजेच २१.४२ टक्के, तर औरंगाबाद विभागात ८७.५८ टीएमसी म्हणजेच ३४.१५ टक्के पाणीसाठा आहे.

प्रकल्पनिहाय पाणीसाठा (टीमसीमध्ये)

प्रकल्प ---संख्या --- पाणीसाठा --- टक्के

मोठे प्रकल्प -- १३९ --- ३१९.६४ --- ३१.२६

मध्यम प्रकल्प -- २६० --- ६५.४० -- २३.६४

लघू प्रकल्प --- २५९४ ---४९.२१ --- २३.६४

एकूण --- २९९३ -- ४३४.२७ --- ३०.५३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT