Water Shortage : ‘आठ दिवसांत तलाव भरून द्या, अन्यथा उपोषण करू’

MLA Suman Patil : तीव्र उन्हाळ्यामुळे शेतकऱ्यांना पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी येऊन सतत पाण्यासाठी विनंती करत आहेत.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Water Sangli News : पाटबंधारे विभागाकडे गेले दीड महिना पाठपुरावा करूनही दाद दिली जात नाही. तासगाव-कवठे महांकाळ तालुक्यातील तलाव येत्या आठ दिवसांत भरून द्यावेत अन्यथाजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा आमदार सुमन पाटील (MLA Suman Patil) यांनी दिला.

आमदार पाटील म्हणाल्या, की तीव्र उन्हाळ्यामुळे शेतकऱ्यांना पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी येऊन सतत पाण्यासाठी विनंती करत आहेत.

तासगाव, कवठे महांकाळ तालुक्यातील तलाव भरून द्यावेत यासाठी गेले दीड महिना पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र अधिकारी दाद देत नाहीत. सतत फोन करूनही शेतकऱ्यांच्या मागणीकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.

Water Shortage
Water Conservation : गाळाने भरलेले नको, पाझरणारे तलाव हवेत...

त्या म्हणाल्या, की चार-पाच दिवस पाणी सोडले जाते मात्र पुन्हा ते बंद होते. परत पाणी टंचाई जाणवते. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने सलग पाणी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पैसे भरूनहीं शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

येत्या आठ दिवसांत दोन्ही तालुक्यातील तलाव भरून दिले नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा आमदार पाटील यांनी या वेळी बोलताना दिला.

जयंत पाटील यांना पाठिंबा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची ‘ईडी’ने चौकशी केल्याबाबत बोलताना आमदार सुमन पाटील म्हणाल्या, की राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आमचाही जयंत पाटील यांना पाठिंबाच आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com