Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : मुसळधार पावसाने माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे २७ गावांना जोडणारा आंबेरी पूल पाण्याखाली गेला आहे. निर्मला नदीला पुर आल्यामुळे माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्ग ः कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) झोडपून काढले आहे. त्यामुळे २७ गावांना जोडणारा आंबेरी पूल पाण्याखाली गेला आहे. निर्मला नदीला पुर (Nirmala River Flood) आल्यामुळे माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. तर आंबेरी पुलावर वाहतूक ठप्प झाली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ माणगाव खोऱ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. माणगाव खोऱ्यातील तब्बल २५ ते ३० गावांमध्ये रविवारी (ता.११) पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या भागातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

हत्तीचा धुमाकूळ

चंदगड, अंबोली परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टस्कर हत्तीने अंबोली नांगरतास येथे भर रस्त्यात पुन्हा दर्शन दिले. त्यामुळे वाहन चालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे १० मिनिटे टस्कर या रस्त्यावर ठाण मांडून होता. यावेळी रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ नव्हती. गाड्यांची वर्दळ वाढल्यानंतर टस्कराने नजीकच्या झाडीत आश्रय घेतला. गेले काही दिवस या परिसरात टस्कराने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या बागायती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: दांगट समितीकडून गैरव्यवहारांची चौकशी नको

China Fertilizer Ban: चीनकडून खत निर्यात थांबल्याने उद्योगांवर परिणाम निश्चित

Aashadhi Wari 2025: संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या वेशीवर

Gujrat Onion Farmers: गुजरातच्या कांदा उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपयांची मदत

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्द करण्याची सरकारला सद्‌बुद्धी दे

SCROLL FOR NEXT