Heavy Rains Agrowon
ताज्या बातम्या

Rain Updates: वाई, महाबळेश्‍वरमधील २३३ कुटुंबांचे स्थलांतर

महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई परिसरांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. महाबळेश्‍वर तालुक्यात कोयना नदीला पूरपरिस्थिती निर्माण होऊन चतुरबेट साकव पूल (Bridge)पाण्याखाली गेल्यामुळे चतुरबेट, घोणसपूरसह चार गावांचा संपर्क तुटला आहे.

अॅग्रोवन वृत्तसेवा

वाई, जि. सातारा : वाई व महाबळेश्‍वर तालुक्यांतील १२ गावांतील २३३ कुटुंबांचे स्थलांतर (Migration) करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली.

प्रांताधिकारी जाधव यांनी कांदाटी खोऱ्यातील व तापोळा परिसरातील अतिवृष्टिग्रस्त गावांना भेट दिली. तेथील परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. अनेक गावांतील ग्रामस्थांनी आपल्या अडचणी प्रातांधिकाऱ्यांसमोर मांडल्या. या वेळी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील उपस्थित होत्या.

महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई परिसरांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. महाबळेश्‍वर तालुक्यात कोयना नदीला पूरपरिस्थिती निर्माण होऊन चतुरबेट साकव पूल (Bridge)पाण्याखाली गेल्यामुळे चतुरबेट, घोणसपूरसह चार गावांचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्‍वर व वाई तालुक्यांत होत असलेल्या पावसाने सुरक्षिततेच्या दृष्टीने महाबळेश्‍वर तालुक्यातील दहा आणि वाई तालुक्यांतील दोन अशा १२ गावांतील २३३ कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर (Migration) करण्यात आले आहे.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चतुरबेट पूल वाहून गेला होता. बांधकाम विभागाने सिमेंटचे पाइप टाकून तात्‍पुरता पूल तयार केला होता. तोही वाहून गेला आहे. दरम्यान, या परिसरात दळणवळणासाठी लोखंडी साकव पूल तयार करण्यात आला होता. तोही पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरात चार गावांचा संपर्क तुटला आहे.

महाबळेश्‍वर व वाई तालुक्यांत मागील वर्षी अतिवृष्टी (Heavy Rainfall) झाली होती. त्यामुळे अनेक गावांतील ग्रामस्थांचे खूप मोठे नुकसान झाले होते. यावेळीही मुसळधार पाऊस या परिसरात सुरूच असून, महाबळेश्वश्‍वर, वाई तालुक्यांत होत असलेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरते स्थलांतर करणे आवश्यक असल्याने महाबळेश्‍वर तालुक्यातील दरे, दुधोशी, घावरी, येर्णे बुद्रुक, येर्णे खुर्द, मालूसर, चिखली, माचुतर, शिंदोळा, धावली या दहा गावांतील २०३ कुटुंबांचे व ९४० व्यक्तींचे स्थलांतर जिल्हा परिषद शाळा, मंदिर, खासगी बंगले व हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. वाई तालुक्यातील जोर व डुईचीचीवाडी येथील ३० कुटुंबांतील १६४ ग्रामस्थांचे जिल्हा परिषद शाळा, समाजमंदिर व एका घरामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी आणखी ३ हजार कोटींचा निधी मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

Electricity Transformer Problems: दुष्काळात सिंचनासाठी धडपड; वीजपुरवठ्याच्या अडचणी कायम

Farmers Protest: ऊस एफआरपी, साखरेच्या एमएसपी प्रश्नी महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी आक्रमक, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घरासमोर आंदोलन

Farmer Protest: करपलेल्या सोयाबीनसह शासन निर्णयाची स्वाभिमानीकडून होळी

Irrigation Power Supply: एक आठवडा दिवसा, तर एक आठवडा रात्री वीजपुरवठा

SCROLL FOR NEXT