Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : अमरावती जिल्ह्यात २,३०० जनावरांचा मृत्यू

दगावण्याचे प्रमाण निम्म्यावर आल्याचा ‘पशुसंवर्धन’चा दावा

Team Agrowon

अमरावती : जिल्ह्यात लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजारामुळे जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण सध्या अर्ध्यावर आले आहे. यापूर्वी दर दिवसाला ५० ते ६० जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण होते, ते आता निम्म्यावर आल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून (Department of Animal Husbandry ) केला जात आहे. सद्यःस्थितीत सुमारे २५ ते ३० जनावरे मृत्युमुखी पडत असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २३०० जनावरांचा मृत्यू लम्पी स्कीन या चर्म आजारामुळे झाला आहे. पशुपालकांना पशुवर्धन विभागाकडून गायवर्गीय जनावरासाठी ३० हजार रुपये, बैलासाठी २५, तर लहान जनावर असल्यास १६ हजार रुपयांची मदत दिली जाते. यातील ८० टक्के निधीचे वाटप झाले असून २० टक्के मदतीचे वाटप निधीअभावी रखडले आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताचा पशुपालकांना त्याचे वितरण केले जाणार आहे.

जिल्ह्यात सध्या बाधित जनावरांची संख्या १,५०० इतकी आहे. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजवर ३,४००० जनावरांना त्याची लागण झाली होती. यातील ३०,००० पेक्षा अधिक जनावरे लसीकरण व पुरेशा उपचारांनी बरी झाली आहेत. जिल्ह्यात चार लाख २५ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहितीदेखील पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. लम्पी स्कीनचा म्युटंट बदलत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT