Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : विदर्भात अतिवृष्टीची २२२ कोटींची मदत

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिके आणि जमिनींच्या मदतीसाठी राज्य सरकारने २२२ कोटी ३२ लाख रुपयांची रक्कम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जमा केली आहे.

टीम ॲग्रोवन

मुंबई : सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने नुकसान (Heavy Rain Crop Damage) झालेल्या पिके आणि जमिनींच्या मदतीसाठी (Crop Damage Compensation) राज्य सरकारने २२२ कोटी ३२ लाख रुपयांची रक्कम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जमा केली आहे. नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांतील शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. सोलापूर आणि पुणे विभागांतील शेतकरीही काही प्रमाणात पात्र ठरेल आहेत.

राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत मोठी अतिवृष्टी झाली होती. या पावसामुळे पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामेही करण्यात आले होते. मात्र मदत व पुनर्वसन विभागाकडे त्याचे प्रस्ताव पडून होते.

आतापर्यंत अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीपोटी ५ हजार, ४३९ कोटी रुपये वितरित केले. मात्र नागपूर आणि अमरावती विभागाच्या आयुक्तांनी मदतीचे फेरप्रस्ताव पाठवले होते. ती मागणी प्रलंबित होती. त्यापोटी २२२ कोटी ३२ लाख रुपये रक्कम विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आले.

त्यामध्ये अमरावतीत विभागाला १७९ कोटी देण्यात आले. याचा लाभ १ लाख ४६ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. नागपूर विभागासाठी ३१ कोटी, ४४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लाभ ३० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यासाठी ४ कोटी ६१ लाखांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ३ हजार ५५८ शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hawaman Andaj: डिटवाह चक्रीवादळ भारताकडे सरकणार; राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहणार

Agrowon Podcast: हरभरा दर स्थिरावले; सोयाबीनमध्ये नरमाई, काकडीला मटारचे भाव वाढले तर सिताफळाचे दर टिकून

Wheat Technology: गव्हाला खताची गरजच नाही; स्वत:साठी अन्नद्रव्य तयार करणारे गव्हाचे वाण विकसित

Fisheries Department: लहान मासे पकडल्यास कारवाई

Crop Insurance: फळपीक विम्याचे ८६० कोटी रुपये वितरित; उरलेली लवकरच जमा करणार

SCROLL FOR NEXT