Election News Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchyat Reservation Draw : राज्यातील २ हजार २१६ ग्रामपंचायत निवडणुकींची आरक्षण सोडत

Grampanchyat Election : निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोडत कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Team Agrowon

Grampanchyat Reservation : राज्यातील २हजार २१६ ग्रामपंचायतींच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपणाऱ्या नवनिर्मित आणि चुकीची प्रभाग रचना झाल्याने निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. १६ जून ते दि. १४ जुलैपर्यंत सोडत कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी, राज्यातील २२८९ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाल्या आहेत. प्रभाग रचना पूर्ण झालेल्या सर्व ग्रामपंचायतीसाठी आरक्षणाचा कार्यक्रम राबविणे क्रमप्राप्त आहे. समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या तसेच ओबीसी आरक्षणाची टक्केवारी निश्चित न झालेल्या अशा ७९ ग्रामपंचायती वगळता उर्वरित २२१६ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.

या कार्यक्रमानुसार दि. १६ जूनला विशेष ग्रामसभेची सूचना देणे, दि. २१ जूनला विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. दि. २२ जूनला सोडतीनंतर विभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप स्वरूप प्रसिद्ध करायचे आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दि. २३ जून ते दि. ३० जूनपर्यंत करायच्या आहेत. या हरकतींवर उपविभागीय अधिकारी हे दि ६ जुलैपर्यंत अभिप्राय देतील. त्यानंतर अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी दि. १४ जुलैला मान्यता देतील तर दि. १४ जुलै रोजी प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT