Solapur ZP  Agrowon
ताज्या बातम्या

Solapur ZP : जिल्ह्यातील २२ ग्रामसेवक निलंबनाची टांगती तलवार

Latest Marathi News : स्वच्छतागृह बांधून तयार आहे परंतु लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३०० लाभार्थी प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित आहेत.

Team Agrowon

Solapur News : स्वच्छतागृह बांधून तयार आहे परंतु लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३०० लाभार्थी प्रत्येकी १२ हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित आहेत.

या १३०० प्रकरणातील ग्रामसेवकांना निलंबित करण्याची सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी केली आहे. सोमवारपर्यंत (ता.१०) मुदत द्या, आम्ही काम पूर्ण करतो अशी विनंती ग्रामसेवकांनी केल्यानंतर कारवाईच्या रडारवरील त्या ग्रामसेवकांना दोन दिवसांची मुदत मिळाली आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत त्यांनी या संदर्भातील आढावा घेतला. या बैठकीला विभागप्रमुख उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील अनुदानापासून वंचित राहिलेल्या १३०० लाभार्थ्यांमधील ३५० प्रस्ताव हे गटविकास अधिकाऱ्यांच्या पातळीवर प्रलंबित आहेत.

उर्वरित ९५० प्रस्ताव हे ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवकांकडे प्रलंबित आहेत. सीइओ स्वामी म्हणाले, स्वच्छ भारतामध्ये सोलापूर जिल्हा फक्त एवढ्या बाबींमुळे पिछाडीवर आहे. ही कामगिरी वेळेत झाल्यास सोलापूर जिल्ह्याची कामगिरी अव्वल होईल.

या अभियानातील कामाबाबत गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना वेळोवेळी सूचना, प्रबोधन व समुपदेशन करण्यात आले आहे. त्यातून फारसा परिणाम दिसत नसल्याने आता निलंबन आणि वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे

कोणाला निलंबित करावे हा माझा हेतू नाही. वारंवार सांगून देखील सुधारणा होत नसेल तर मला आता निलंबन शिवाय पर्याय नाही. सोमवारपर्यंत ज्या ग्रामसेवकांचे कामकाज पूर्ण होणार नाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अटळ आहे. तसेच त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली जाणार आहे.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT