Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : उपचारानंतर २१ जनावरे ‘लम्पी’मुक्त

उपचारानंतर दोन गावांतील २१ जनावरे या आजारातून मुक्त झाली आहेत. तीन तालुक्यांतील सहा जनावरांच्या नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

टीम ॲग्रोवन

परभणी ः जिल्ह्यातील तीन गावांतील २३ जनावरांना लम्पी स्कीन (Lumpy Skin) प्रादुर्भाव झाला होता. उपचारानंतर दोन गावांतील २१ जनावरे या आजारातून मुक्त झाली आहेत. तीन तालुक्यांतील सहा जनावरांच्या नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. गुरुवार (ता. १५) पर्यंत २८ गावांतील १५ हजार ७६८ जनावरांचे लसीकरण (Lumpy Vaccination) पूर्ण झाले आहे. जिल्ह्यांसाठी ८९ हजार लसीचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन (Animal Husbandry) उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे (Dr. P.P. Nemade) यांनी दिली.

मागील आठवड्यात परभणी जिल्ह्यात आजवर परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी, बलसा, मांगणगाव या तीन गावांतील २३ जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. या आजाराचा संसर्ग झालेल्या जनावरांवर उपचार करण्यात आल्यानंतर बोबडे टाकळी येथील ११ आणि बलसा येथील १० संसर्गस्त जनावरे या आजारातूनमुक्त झाली आहेत.

पिंपळा (ता. मानवत), पूर्णा, कुपटा (ता. सेलू) येथील प्रत्येकी एक आणि कान्हड (ता. सेलू) येथील ३ असे एकूण ६ नमुने या आजाराच्या निदानासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यांचे अहवाल अजून प्रलबिंत आहेत. संपूर्ण जिल्हा नियंत्रण क्षेत्र जाहीर करण्यात आला आहे. जनावरांचे बाजार तसेच वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. जिल्ह्यातील १५ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण... जिल्ह्यात गो वंशीय जनावरांची संख्या २ लाख ९८ हजार आणि म्हशीची संख्या सुमारे १ लाख आहे. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या तसेच निदानासाठी रक्त नमुने घेतलेल्या गावांच्या ५ किलोमीटर परिसरातील गावांतील जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे.

गुरुवार (ता.१५) पर्यंत २८ गावांतील १५ हजार ७६८ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले. शुक्रवारी (ता. १६) १० गावांतील जनावरांना लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्ह्यातील ३७ गो शाळांमधील साडेतीन हजारांपैकी २ हजार ६३५ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले. आजवर जिल्ह्यात ८९ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. या आजारामुळे जिल्ह्यातील जनावरांचा मृत्यू झाला नाही, असे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GMO Indian Rice : चीनने भारताचा तांदूळ परत पाठवला; तांदळात जीएमओ असल्याचा आरोप

Water Level Drops: गिरणा धरणातील जलसाठा घटू लागला

Agrowon Podcast: मका भाव दबावातच; सोयाबीनची आवक मंदावली, कापूस आवक स्थिर, गहू आवक सुधारली तर तूर दर स्थिर

Grape Farmers Loss: द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, नैसर्गिक आपत्तीमुळे नाशिक जिल्ह्यातील ७५ टक्के क्षेत्र बाधित

School Nutrition Banana Supply: पोषण आहारात केळीचा पुरवठा अल्पच

SCROLL FOR NEXT