Water Conservation Agrowon
ताज्या बातम्या

Water Bunds : रत्नागिरीत श्रमदानातून २ हजार वनराई बंधारे

गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत.

Team Agrowon

रत्नागिरी ः ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ (Pani Aadva Pani Jeerva) या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे (Bandhara) उभारले जातात. यंदाही श्रमदानातून २ हजार ३२७ बंधारे बांधण्यात (Water Conservation) आले असून त्यामध्ये साधारणपणे ७० कोटी लिटर पाणी साठले आहे.

गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत.

सात वर्षांपूर्वी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. पहिल्या वर्षी दहा हजार बंधाऱ्यांचे लक्ष ठेवले होते. त्यापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक बंधारे उभारण्यात यश आले.

कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या विजय बंधाऱ्यांचे मॉडेल पाणी साठवून ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त असल्याचे दिसून आले.

सिमेंटच्या पोत्यांचा उपयोग करून हे बंधारे उभारले जातात. यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोसमी पाऊस सुरू होता. त्यामुळे गावागावातून वाहणारे नदी, नाल्यांचे प्रवाह वेगवान होते.

परिणाम प्रत्यक्ष बंधारे बांधण्यासाठी उशीर झाला. फेब्रुवारी महिना आला तरीही अनेक ग्रामस्थ अजूनही श्रमदानातून बंधारे उभारत आहेत.

प्रत्येक गावाला दहाचे लक्ष्य दिले होते; परंतु गावानिहाय प्रत्येकी तीन ते चार बंधारे उभारण्यात येत आहेत. काही वाड्या कमी लोकसंख्येच्या असल्याने तेथे श्रमदानासाठी लोकांचा प्रतिसाद मिळत नाहीत.

बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी, कपडे धुणे, गाई-गुरांसाठी केला जातो. तसेच बंधारा बांधल्यानंतर अडलेले पाणी जमिनीत जिरते आणि किनाऱ्यावरील विहिरींची पाणी पातळीही वाढण्यास मदत होते.

एप्रिल, मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणी पातळी कमी होते. काही ठिकाणी विहिरी पूर्णतः कोरड्या पडतात. त्या वेळी पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो.

बंधाऱ्यातील पाण्यामुळे अनेक विहिरींचे पाणी उशिरापर्यंत वापरण्यास मिळत आहे. काही गावांमध्ये कच्चे बंधारे विहिरींची पाणी पातळी वाढविण्याच्या उद्देशानेच उभारले जातात.

गेल्या दोन वर्षांत गावागावात पाणी योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

तालुकानिहाय बांधण्यात आलेले बंधारे

तालुका बंधारे

मंडणगड - १०३

दापोली - ५०६

खेड - १०५

चिपळूण - ३०१

गुहागर - २५७

संगमेश्वर - ३२५

रत्नागिरी - २५४

लांजा - २३९

राजापूर - २३७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather: राज्यात किमान तापमानात वाढ; उकाड्यातही झाली वाढ 

Rabi Sowing Update: बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणी ३० टक्क्यांवर

Onion Farming: रब्बी कांद्याची आंतरमशागत कधी करावी? तणांचा बंदोबस्त कसा कराल?

Shaktipeeth Highway Protest: सांगलीच्या खानापूरमध्ये 'शक्तिपीठ' विरोधात संघर्ष तीव्र, शेतकऱ्यांनी हातात दगड घेतले, महिलाही संतप्त, मोजणी उधळली

Farm Road Development Work: तहसीलदारांच्या पाठीवर महसूल मंत्र्यांकडून कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT