ताज्या बातम्या

Government Fund : सोलापूर- पंढरपूर मार्गासाठी २० कोटी रुपयांचा निधी

सोलापूर-पंढरपूर मार्गावरील पंढरपूर- देगांव- चिंचोली- टाकळीसिकंदर- कुरुल ते राज्य मार्ग - २०२ ला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग ६६ या रस्त्याचे काम रस्ते विशेष दुरुस्ती मधून होणार असून याकरिता वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली

टीम ॲग्रोवन

टेंभुर्णी, जि. सोलापूर : सोलापूर-पंढरपूर मार्गावरील (Solapur Pandharpur Road) पंढरपूर- देगांव- चिंचोली- टाकळीसिकंदर- कुरुल ते राज्य मार्ग - २०२ ला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग ६६ या रस्त्याचे काम रस्ते विशेष दुरुस्ती मधून होणार असून याकरिता वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे (Bananrao Shinde) यांनी दिली.

आमदार बबनराव शिंदे म्हणाले, की महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री.विठ्ठल -रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक पंढरपूर ला येत असून सोलापूर-पंढरपूर मार्गावरील पंढरपूर-देगांव-चिंचोली- टाकळी-सिकंदर-कुरुल ते राज्य मार्ग २०२ ला जोडणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ६६ या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.

पंढरपूर व सोलापूर मुख्यालयास जोडणारा हा जवळचा मार्ग आहे. तसेच या रस्त्यावर साखर अनेक कारखान्यांची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. सध्या या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. तसेच खराब रस्त्यामुळे परिसरातील नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या रस्त्याच्या सुधारणेसाठी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा सुरू होता. मागच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, या मागणीसाठी लक्षवेधी सूचना मांडली होती. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मार्च २०२२ मध्ये मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून या रस्त्याच्या दुरुस्तीस चाळीस कोटी रुपये निधी देण्यास मंजुरी देऊन तातडीने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली होती.

आता विशेष दुरुस्ती अंतर्गत २० कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शासनाकडे मंजूरीकरीता पाठविण्यात आला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी या रस्त्यास विशेष दुरुस्ती मधून सुधारणा करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables : गावागावांत रानभाजी महोत्सव व्हावा : पाटील

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

SCROLL FOR NEXT